ETV Bharat / state

'कृषी विधेयकातील अनेक मुद्दे काँग्रेसच्याही जाहीरनाम्यातील, मग विरोध का?'

कृषी विधेयकावर केवळ राजकारण केले जात आहे. या विधेयकाची अंमलबजावणी न करणे, हे शेतकरीविरोधी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Sep 25, 2020, 6:07 PM IST

Updated : Sep 25, 2020, 6:55 PM IST

नवी मुंबई - काँग्रेस पक्षाने २०१९च्या जाहीरनाम्यात शेतीसंदर्भात जे काही म्हटले होते, त्याचा या नव्या कृषी विधेयकात समावेश आहे. मात्र, आता ते या विधेयकाला विरोध करत आहेत. आम्ही सत्तेत आलो तर हे करणार. मात्र, नाही आलो तर, दुसऱ्यांना करू देणार नाही, अशी यांची ही आडमुठी भूमिका झाली. कृषी विधेयकावर केवळ राजकारण केले जात आहे. या विधेयकाची अंमलबजावणी न करणे हे शेतकरी विरोधी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माहिती देताना

राज्यात या विधेयकाची अंमलबजावणी करावी लागेल, असेही फडणवीस म्हणाले. माथाडी कामगारांचे प्रेरणास्थान आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी भवनमध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यास मोजक्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सुरक्षित अंतराचे पालन करत माथाडी भवन येथे माथाडी कामगारांचा ऑनलाइन मेळावा घेण्यात आला. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार प्रसाद लाड, आमदार गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे व इतर मान्यवर सहभागी झाले होते.

हेही वाचा - एनसीबी 'ड्रग्ज' तपास: एकाकडून दुसरा, दुसऱ्याकडून तिसरा, तिसऱ्याकडून अनेकांचे कसे होते संबंध?

कृषी विधेयकावर निव्वळ राजकारण केले जात असून सरळ-सरळ दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. केवळ राजकारण करण्याच्या त्यांच्या या प्रकाराला शेतकरीच उत्तर देतील, त्यामुळे अंमलबजावणी त्यांना करावीच लागेल, असेही फडणवीस म्हणाले. सद्यस्थितीत बिहारची निवडणूक घोषित झाल्या. कोरोनाच्या काळात ही निवडणूक म्हणजे एक प्रकारचे आव्हान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिहारच्या सामान्य जनतेचा विश्वास आहे. यासोबतच नितीश कुमार, सुशील मोदी यांनी केलेल्या कामांमुळे बिहारमध्ये प्रचंड मोठा विजय 'रालोआ'ला मिळेल, असा मला विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले.

Last Updated : Sep 25, 2020, 6:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.