ETV Bharat / state

फ्लेमिंगोसह दुर्मिळ पक्षीदर्शन, ठाणे खाडीत बोट सफारी - Thane Creek Flamingo Sanctuary

ठाणे खाडीत विविध जैविक तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती विपूल प्रमाणात आहे. ठाण्यापासून ते विक्रोळी, मानखुर्दपर्यंत खाडीपात्र पसरले असून याठिकाणी गुजरात्या कच्छच्या रणातून आलेल्या फ्लेमिंगो पक्षांचा वावर वाढत आहे. केवळ हिवाळ्यातच खाडीची सैर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांनी सर्व ऋतूत खाडीत मुक्काम ठोकल्याने खाडी पात्र गुलाबी रंगाने उधळून निघालेली दिसते. त्यामुळे 2015 मध्ये ठाणे खाडीला फ्लेमिंगो पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

ठाणे खाडीत बोट सफारी
ठाणे खाडीत बोट सफारी
author img

By

Published : Mar 7, 2020, 3:37 AM IST

ठाणे - भक्ष्याच्या शोधात येणाऱ्या स्थलांतरित दुर्मिळ पक्षांचे थवेच्या थवे ठाणे खाडीत पाहावयास मिळतात. त्यातल्या त्यात फ्लेमिंगो या गुलाबी पक्षांचा रुबाब काही औरच असतो. केवळ हिवाळ्यातच खाडीची सैर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांनी सर्व ऋतूत खाडीत मुक्काम ठोकल्याने खाडी पात्र गुलाबी झाल्याचे दिसते. यामुळे, फ्लेमिंगोसह नानाविध दुर्मिळ पक्षांचे दर्शन करण्याची संधी पर्यावरणप्रेमींना अनुभवता येत आहे. ऐरोली येथील खाडीलगतच्या केंद्रावरून निघणाऱ्या बोट सफारीने थेट खाडीपरिसरात नौकानयनासह पक्षी निरीक्षणाची पर्वणी लाभली आहे.

ठाणे खाडीत बोट सफारी

ठाणे खाडीत विविध जैविक तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती विपूल प्रमाणात आहे. ठाण्यापासून ते विक्रोळी, मानखुर्दपर्यंत खाडीपात्र पसरले असून याठिकाणी गुजरात्या कच्छच्या रणातून आलेल्या फ्लेमिंगो पक्षांचा वावर वाढत आहे. केवळ हिवाळ्यातच खाडीची सैर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांनी सर्व ऋतूत खाडीत मुक्काम ठोकल्याने खाडी पात्र गुलाबी रंगाने उधळून निघालेली दिसते. त्यामुळे 2015 मध्ये ठाणे खाडीला फ्लेमिंगो पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! महापालिका शाळेत शाळकरी मुलींकडून केली जाते शौचालयाची स्वच्छता

ठाणे खाडी किनाऱ्यावर ऐरोली येथे महाराष्ट्रातील पहिले किनारी व सागरी जैवविविधता केंद्र वनविभागाच्या कांदळवन विभागाकडून उभारण्यात आले आहे. ऐरोलीतील सेक्टर दहा येथे खाडीकिनारी हे केंद्र सुरू असून येथील दालनात अद्ययावत माहिती, खारफुटीचा तपशील, सागरी जिवांचे प्रकार, भरती-ओहोटीचे शास्त्र, सागरी पक्षी, वनस्पती यांचे महत्त्व आदींची माहिती या केंद्रातून दिली जाते. तसेच, खाडी पर्यटन आणि दुर्मिळ पक्षी दर्शन घडवण्यासाठी जानेवारी 2018 मध्ये बोट सफारीद्वारे नौकायनास सुरुवात करण्यात आली. हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये फ्लेमिंगो आणि कौस्तुभ या दोन नौकांमधून निसर्गप्रेमींना खाडीचे सौंदर्य, खारफुटी, खाडीतील जैवविविधता आणि फ्लेमिंगोसह स्थलांतरीत पक्ष्यांचे दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. या उपक्रमामुळे वनविभागाच्या महसुलात चांगलीच भर पडत आहे.

हेही वाचा - पैशाच्या आमिषाने दहावीच्या परीक्षेत बसलेल्या तोतया विद्यार्थ्याला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.