ठाणे - भिवंडी शहराजवळ असलेल्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपार येथील दोन मजली इमारतीचा रस्त्याच्या बाजूने असलेला एक भाग कोसळला. या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला ( One Died Due to Building Collapsed ) आहे. शीडा दादू पढेर ( वय 72 वर्षे, रा. जव्हार, जिल्हा पालघर ), असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.
पहिल्या मजल्याच्या गॅलरीचा भाग कोसळला
भिवंडी नजीक खाडीपार येथे एक दोन मजली इमारत असून त्याच्या तळमजल्यावर सागर किनारा हॉटेल आहे. त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हॉटेलमधील कामगार राहतात. मंगळवारी (दि. 4 जानेवारी) दुपारच्या सुमारास या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीचा रस्त्याच्या बाजूने असलेला सज्जा अचानक कोसळला. त्याच सुमारास मूळ पालघर जिल्ह्यातील जव्हार रहिवाशी असलेला भिक्षेकरी भिवंडीतील एका आदिवासी पाड्यावर राहत असलेला शीडा दादू पढेर हा त्या ठिकाणाहून जात होता. त्यावेळी त्याच्या डोक्यावर गॅलरीचा ढिगारा पडला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने तो जागेवरच गतप्राण झाला.
इमारत मालकावर कारवाई
या घटनेनंतर निजामपुरा पोलीस घटनास्थळी ( Nizampura Police ) दाखल होत त्यांनी हॉटेल इमारत मालक शादाब हनी या विरोधात कारवाई सुरू केली आहे.
हेही वाचा - Boy drowned in bucket : पाण्याने भरलेल्या बादलीत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू