ठाणे - मालेगावहून डोंबिवलीच्या वेशीवर आलेल्या एका भाजीपाल्याच्या टेम्पोमधून गोमांस आणण्यात येत होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सर्तकतेमुळे दिड टन गोमांस टेम्पोसह मानपाडा पोलसांनी जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे मार्च, 2015 पासून गोमांस विक्रीसाठी बंदी असूनही आजही भिवंडी, कल्याण, मुंब्रा, ठाणे व मुंबई या भागात हे गोमांस विक्रीसाठी ट्रक, टेम्पोमधून इतर जिल्ह्यासह पर राज्यातून विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे अनेकदा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले आहे.
भाजीपाल्याच्या आडून जनावरांच्या मांसाची वाहतूक
डोंबिवलीतील काटई नाक्यावर रविवारी (दि. 21) सकाळच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना एका टेम्पोतून (क्रं. एम एच 03 सीव्ही 8853) गोमांस वाहतूक होत असल्याचा संशय आला. त्यामुळे बजरंगदल कार्यकर्त्यांनी त्या टेम्पोची पाहणी केली. तेव्हा भाजीपाल्याच्या खाली मांस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्वरीत टेम्पो व चालकास मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांनतर पोलिसांनी बेकायदा जनावरांचे मांस वाहतूक केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
हेही वाचा - राहुल गांधी यांच्याविरोधातील याचिकेवर भिवंडी न्यायालयात 15 मेला सुनावणी