ठाणे - दिवसेंदिवस कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. पुढील 2 आठवड्यात रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, १५ जुलैपर्यंत पालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यातील ७० ते ७५ टक्के रुग्ण हे लक्षणे विरहीत असणार असल्याने ते सहज कोरोनावर मात करतील असा आशावाद पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे कोरोनाचा वाढता पादूर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन सर्व ताकदीनिशी सज्ज झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी ६ ते ७ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोनाचा पादुर्भावामुळे कोरोनाबाधित रुग्णाची संख्या जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाच पटीने वाढली असल्याने केडीएमसी कोरोनाच्या रडार असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे कोरोनाचा पादूर्भाव आणि दुसरीकडे पावसाळ्यातील साथीच्या आजाराने डोके वर काढल्यास पालिकेची आरोग्ययंत्रणा कोलमडून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालिका आयुक्तांनी कोरोनाचा पादूर्भाव होत असलेल्या प्रभागात कनटेनमेंट झोन जाहीर केला आहे. या झोनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस अधिकारी यांनी या परिसराची पाहणी केली.
पादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी उपाय योजना रावबवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. या कनटेनमेंट झोनमधून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पूर्णता बंदी घातली असून, केवळ जीवनावश्यक सेवा व मेडिकल यांना बाहेर पडण्यास मुभा दिली आहे. बाकीच्या कनटेनमेंट झोनमधील लोकांनी घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आकारून कडक कारवाई देखील करण्यात येणार आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असून कोरोनाचा संसर्ग जास्त पसरू नये व तो रोखता यावा यासाठी ३९ कनटेनमेंट झोन तयार करून ते झोन सील केले आहेत. अजून काही भागात कनटेनमेंट झोन जाहीर करून परिसर सील करण्यात येणार आहेत. तर कनटेनमेंट झोन नियंत्रणात ठेवण्यात आला पाहीजे, अॅक्टिव्ह सर्व्हेलन्स चांगला झाला पाहिजे. त्यासाठी सर्व प्रभागात कोरोना कमीटी नेमून वाँलेन्टीयर नेमले आहेत.
साथीच्या आजाराने डोकं वर काढले असून तापाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे ताप आल्यास तापाचा आजार आंगावर न काढता, तत्काळ दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. पालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुगणाची संख्या 5 हजाराच्या जवळपास गेली असून, येत्या काही दिवसात १५ जुलैपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २० हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वर्तवली आहे. मात्र, यातील ७० ते ७५ टक्के रुग्ण असेंमटेमिक आल्याने ते कोरोनावर मात करतील. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. उर्वरित रुग्णाच्या उपचारासाठी खबरदारी म्हणून ६ ते ७ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापेक्षाही अधिक बेडची तयारी सुरु केली आहे. तसेच प्रत्येक वोर्डातच रुग्णांना २००ते ३०० बेडची व्यवस्था होईल अशा जागेच्या शोधात असून, प्रभागातील रुग्णाला त्याच ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.