ठाणे - पनवेलमधल्या तळोजा एमआयडीसीत मुख्य रस्त्यावर बांधकाम विभागाने नुकतीच नव्याने बांधलेल्या कमानीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. यात दोन कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तळोजा एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावर रात्रीच्या सुमारास ही कमान कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांचे मोठे हाल झाले.
हेही वाचा - भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; तिघे ठार
पनवेलमधील नावडे पुलाखाली उतरल्यानंतर काही मिटर अंतरावर तळोजा एमआयडीसीचा मुख्य रस्ता सुरू होतो. याच रस्त्याच्या प्रवेशद्वाराजवळ बांधकाम विभागाने नवीन स्वागत कमान बांधण्याचे काम सुरु केले होते. वरच्या बाजूने स्लॅबचे बांधकाम सुरू असतानाच कमानीचा खालचा काही भाग कोसळला. यात कमानीचे बांधकाम करत असलेले दोन कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पण नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. या दोन्ही कामगार गंभीर जखमे झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - दहा महिन्याच्या मुलाला जन्मदात्या आईने फेकले विहिरीत; शेलुबाजार येथील घटना
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी, महापालिका अधिकारी, पोलीस आणि एमआयडीसीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर कोसळलेल्या बांधकामाचा ढिगारा बाजूला करत त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली.
हेही वाचा - सोलापूरमध्ये प्रेम प्रकरणातून दहावीच्या मुलीची आत्महत्या
कमान रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. पनवेल शहरातून कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ या दिशेने जाण्या येण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे या कमानी खालून हजारो वाहन ये जा करतात. रात्रीच्या वेळी ही कमान कोसळल्याने या दुर्घटनेतील जिवीतहानी टळली.