ठाणे- उल्हासनगर महानगरपालिका महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी दुपारी ३ ते ५ दरम्यान अर्ज दाखल झाल्याने राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. महापौरपद खुल्या वर्गासाठी असल्याने इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली असून शिवसेना विरुद्ध भाजप व साई पक्षाच्या युतीने कंबर कसली आहे. तर, ओमी कालानीला विधानसभा निवडणुकीत भाजपने धोका दिल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत कलानी भाजपचा वचपा काढणार असल्याचे संकेत आहे.
महापौर पदासाठी शिवसेना, भाजप, साई पक्ष, राष्ट्रवादी पक्षातून अनेक इच्छुक उमेदवार रांगेत होते. मात्र, राज्यातील सत्तांतरावर शहरातील राजकीय समीकरण अवलंबून आहे. शिवसेनेकडून, लिलाबाई आशान तर भाजपकडून जमनूदास पुरस्वानी, साई पक्षाकडून जीवन इदनानी यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केले. तर, ओमी समर्थक नगरसेवक निवडणुकीच्या मैदानात उतरले नाही.
विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत भाजप, ओमी गटाची आघाडी होऊन ओमी समर्थकांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत ओमी गटाचे महापौर पंचम कालानी यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहे. प्रत्यक्षात ओमी टीम शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा शहरात सुरू असून शिवसेनेने तसे संकेत दिले आहे. तर, साई पक्षाचे जीवन इदनानी यांनीही महापौरपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे.
भाजप,साई व शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
महापौर पदासाठी भाजपकडून जमनादास पुरसवाणी, शिवसेने तर्फे लिलाबाई आशान तर साई पक्षाचे जीवन ईदनानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौर पदासाठी भाजपकडून विजू पाटील, साई पक्षातर्फे दीपक सिरवानी, आरपीआयचे भगवान भालेराव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भरत राजवणी (गंगोत्री) अशा चार उमेदवारांनी नामांकन भरले आहे. भाजपकडून उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह आदी लोक उपस्थित होते. तर, शिवसेनेचा अर्ज दाखल करताना गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे यांच्यासह आदी उपस्थित होते.
हेही वाचा- बांधकाम विकासकांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात