ETV Bharat / state

BJP MLA Fake Message To Women: भाजप आमदाराच्या नावाने महिलांना हाय, हॅलो, भेटू शकता का? मॅसेज पाठविले, आरोपी अटक

author img

By

Published : Jul 9, 2023, 11:06 PM IST

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट तयार करत महिलांना हाय, हॅलो, तुम्ही भेटू शकता का? असे मॅसेज पाठवणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चंदन सुभाष शिर्सेकर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी चंदन हा ओला कार चालक असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

BJP MLA Fake Message To Women
आरोपीस अटक
आमदाराच्या फेक अकाउंट प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

ठाणे: काही महिलांनी आमदार गणपत गायकवाड यांना तुम्ही आम्हाला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली आहे का? असे विचारले त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी आमदार गायकवाड यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी फेक आकाऊंट तयार करत महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मेसेज करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला. मात्र, त्याने हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला याचा तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत. मात्र, या प्रकरणात सूत्रधाराला लवकरच अटक करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.

व्हायरल व्हिडीओ नंतर फ्रेंड रिक्वेस्टचा प्रकार? काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व विधानसभेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांच्या आवाजा ऐवजी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज टाकण्यात आला होता. या प्रकरणात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना त्यांच्या नावाने फेसबूकवर फेक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे महिलांना 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठविली जात होती. त्यामध्ये हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, तुम्ही भेटू शकता का ? असा मेसेज आमदाराच्या फेक फेसबुकवरून पाठविला जात होता. त्यापैकी काही महिलांनी थेट आमदार गायकवाड यांना साहेब तुम्ही मला फेसबूकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली आहे का? अशी विचारणा केली. हे ऐकून गायकवाड यांनी धक्काच बसला.

पोलिसांचा तपास सुरू: आमदार गायकवाड यांनी कोणालाही फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली नसताना ही विचारणा कशी काय झाली. काेणी तरी त्यांचे फेसबूकवर फेक अकाऊंट काढून हा प्रकार करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर आमदारांनी थेट ठाणे पाेलीस आयुक्तांकडे तक्रार दिली. या तक्रारी वरून कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी उल्हास जाधव, हरिदास बोचरे यांनी तपास सुरू केला असता, आरोपी चंदन हा कोळसेवाडी परिसरात राहत असल्याचे समोर आले. शिवाय त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.

आरोपीला पोलीस कोठडी: विशेष म्हणजे, आरोपी चंदन हा पकडला जाऊ नये यासाठी तो दुसऱ्यांचे वायफाय आणि हॉटस्पॉटचा वापर करीत होता. रविवारी दुपारी चंदनला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे आरोपी चंदनने हा प्रकार का केला, कोणाच्या सांगण्यावरुन केला आहे का? असे मेसेज पाठवून काही आर्थिक फायदा केला आहे का? या विविध प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा:

  1. Nashik Crime News : नाशिकमध्ये एटीएमचं गेलं चोरीला!, पहा सीसीटीव्ही फुटेज
  2. Mumbai Crime: मसाजच्या नावावर हॉटेलमध्ये बोलावले अन् बंदुकीच्या धाकावर लुटले; वाचा धक्कादायक घटना
  3. Tomato Price Controversy: टोमॅटोवरून ग्राहक आणि विक्रेते आपापसात भिडले; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.