ETV Bharat / state

बदलापुरात पबजी खेळाडूंसाठी आरक्षित जागेचा फलक; तक्रार दाखल - तक्रार

बदलापुरात पबजी खेळाडूंसाठी चक्क आरक्षित जागेचा फलक एका झाडावर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

ट्विट्
author img

By

Published : Apr 5, 2019, 6:18 PM IST

Updated : Apr 6, 2019, 12:06 AM IST

ठाणे - बदलापुरात पबजी खेळाडूंसाठी चक्क आरक्षित जागेचा फलक एका झाडावर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, एका वृद्ध नागरिकाला हा फलक खटकल्याने त्याने ट्विट्मार्फत थेट पोलीस आयुक्तांकडे याबाबतची तक्रार केली आहे.

फलकाबाबत माहिती देताना पोलीस आणि नागरिक

पबजी गेममुळे अनेक मुलांना जीव गमवावे लागल्याने पबजी गेम वादग्रस्त ठरला. तरीही हा गेम खेळणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. यातच शहरातील कात्रप परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका झाडाला पबजी खेळाडूंची आरक्षित जागा, असा फलक लावण्यात आला आहे. या फलकावर, ही जागा पबजी खेळाडूंसाठी राखीव आहे. ओन्ली पबजी फायटर्स हुकूमावरून, अशा सूचनाही यावर लिहिण्यात आल्या आहेत.

हा फलक पाहून अनेकांनी चांगल्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या. मात्र, एका वृद्ध नागरिकाला हा फलक खटकल्याने त्यांनी ट्विटच्या माध्यमातून थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे याबाबतची तक्रार केली. या तक्रारीवरून पोलीस आयुक्तांनी बदलापूर पूर्व पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हा फलक झाडावरून काढून ताब्यात घेतला. मात्र, हा प्रकार खोडसाळपणा करण्यासाठी काही मुलांनी केला असावा, अशी चर्चा आता शहरात रंगली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:अजबच ! पबजी गेम खेळाडूंची आरक्षित जागा झाडाखाली

ठाणे :- पबजी गेम मुळे अनेक मुलांना जीव गमवावे लागल्याने पबजी गेम वादग्रस्त ठरला आहे, तरीही पबजी गेम खेळणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे, विशेषतः शाळा आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणींना या गेम चे वेड लागले आहे त्यातच बदलापुरात पब्जी खेळाडूंसाठी चक्क आरक्षित जागेचा फलक एका झाडावर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे,

मात्र एक वृद्ध नागरिकाला हा फलक लावण्याचे खटकल्याने त्यांनी थेट पोलीस आयुक्तांना ट्विट्मार्फत तक्रार करून एकच खळबळ उडवून दिली, बदलापूर शहरातील कात्रप परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका झाडाला पबजी खेळाडूंची आरक्षित जागा असा फलक लावण्यात आला, या फलकावर गंमत म्हणून लिहिले गेले की ही जागा पब्जी खेळाडूंसाठी राखीव आहे ओन्ली पबजी फायटर्स हुकुमावरून अश्या सूचना लिहिण्यात आल्या, हा फलक पाहून अनेकांनी चांगल्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या,
दरम्यान एका वृद्ध नागरिकाला हा फलक खटकल्याने त्यांनी थेट ठाणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली, या तक्रारीवरून पोलिस आयुक्तांनी बदलापूर पूर्व पोलिसांना कारवाई चे आदेश दिल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हा फलक झाडा वरून काढून ताब्यात घेतला, मात्र हा प्रकार खोडसाळपणा करण्यासाठी काही मुलांनी केला असावा, अशी चर्चा आता बदलापूर शहरात रंगली आहे,

सर, बाईट, फोटो, ftp

ftp foldar ..pubji story badlapur 5.4.19

Conclusion:पबजी
Last Updated : Apr 6, 2019, 12:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.