ETV Bharat / state

Municipal elections : आगामी पालिका निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र लढण्याची चिन्ह नाही

सरकार मध्ये बदल होत भाजपची कास धरत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत राज्याची सत्ता मिळवली. मात्र दुसरीकडे बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामधील परिस्थिती बिघडत चाललेली आहे. (No sign of BJP and balasaheb shivSena alliance ) सरकार बसल्यापासून ठाण्यात भाजपसोबत दोन तीनदा मोठे वाद झालेले आहेत. (Thane municipal election) या वादाच रूपांतर आगामी निवडणुकांवर देखील झालेला पाहायला मिळणार आहे. ( upcoming municipal elections in thane )

sign of BJP Sena fighting together
आगामी पालिका निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र लढण्याची चिन्ह नाही
author img

By

Published : Jan 4, 2023, 1:32 PM IST

आगामी पालिका निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र लढण्याची चिन्ह नाही

ठाणे : शिवसेनेची पूर्ण सत्ता असलेल्या ठाणे महानगरपालिकेवर आतापर्यंत शिवसेना वर्चस्व गाजवत होती. ( No sign of BJP and balasaheb shivSena alliance ) मात्र राष्ट्रवादीचा विरोध आणि भाजपची नसलेले साथ आगामी महानगरपालिका निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेला अडचणीत आणणार आहे. या आगामी निवडणुकीत यामुळे भाजपसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील सोबत असलेली पाहायला मिळत आहे. ( upcoming municipal elections in thane ) निधी न मिळणे पदांचे वाटप व्यवस्थित न करणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी भाजपचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांकडे आणि प्रशासनाकडे वारंवार करत होते. निधी न मिळाल्याने प्रभागांमध्ये विकास कामे रखडलेली आहेत आणि यामुळे निवडणुकीत भाजपला अडचण होऊ शकते हे लक्षात घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून असा प्रकारे जाणून बुजून प्रयत्न करण्यात आला आणि यामुळे नाराज झालेल्या भाजपने सत्तेत एकत्र असूनही बाळासाहेबांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसलेली आहे. (Thane municipal election )

पूर्ण सत्तेचा माज : भाजपच्या काही नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला पूर्ण सत्ता मिळाल्याचा माज असल्याचे सांगत येणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला देखील चांगले यश मिळेल आणि मग त्यावर आम्ही विचार करू असे देखील सांगितला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातील ( Uddhav Thackeray group ) नगरसेवकांच्या झालेल्या अडचणी या मतदारांना पसंत पडलेल्या नाहीत आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या भांडणांमध्ये एकनाथ शिंदे गटाकडे जरी आकडेवारी जास्त दिसत असली तरीही आकडेवारी आगामी निवडणुकीत कमी झालेली पाहायला मिळू शकते असे जाणकार सांगतात.

प्रभाग रचनेपासून होत आहेत आरोप : भाजपने मागील टर्म मध्ये देखील शिवसेनेवर सोयीने प्रभाग रचना केल्याचा आरोप केलेला आहे. आपले संख्या वाढवण्यासाठी हा प्रयत्न करताना त्यांनी इतर प्रभागांमध्ये देखील फेरफार केल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत. याला प्रशासनाने देखील मदत केली असल्याचा आरोप झाला आहे. भविष्यात या सर्व बाबींमुळे शिवसेना-भाजप ठाण्यात एकत्र महापालिका निवडणुकी पाहता येणार नाही.

दिव्या मध्ये तर उघड उघड विरोध : आतापर्यंत सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि सेनेमध्ये दोन तीनदा मोठे वाद झाले. यामध्ये काल परवा झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण आणि दिव्याला सिंगापूर बनवण्याचे दिलेले आश्वासन यामुळे दिव्यातील भाजपा आणखीन आक्रमक झाली आहे. त्यांनी उघड उघड विरोध करणे सुरू केला आहे. याआधी देखील नागरी सुविधांच्या अभावामुळे दिव्यातील भाजप कायम सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात आंदोलन करत होते आणि आता तर दिव्यात उघड उघड विरोध करत निवडणुकीची तयारीही करण्यात आली आहे. असे दिवा भाजपचे पदाधिकारी रोहिदास मुंडे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.