ETV Bharat / state

धक्कादायक..! नऊ वर्षाच्या मुलीची हत्या; मृतदेह फेकला कसारा घाटात, दोघे गजाआड - ठाणे गुन्हे बातम्या

भारतीला इंग्लिश पद्धतीच्या कमोडवर शौचास बसता येत नव्हते. 07 नोव्हेंबरला तिने कपड्यांमध्ये लघुशंका केली. यावेळी राग अनावर झालेल्या प्रकाशने....

nine-year-old girl was killed and thrown in kasara valley
नऊ वर्षाच्या मुलीची हत्या करुन मृतदेह कसारा घाटात फेकला
author img

By

Published : Dec 13, 2019, 9:30 AM IST

Updated : Dec 13, 2019, 9:42 AM IST

ठाणे - शिक्षण देण्याच्या बहाण्याने घेऊन आलेल्या नऊ वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी या मुलीचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिला. हत्या करणाऱया व मृतदेहाची टेम्पोने वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.शिवाजी राठोड यांनी दिली.

हत्या करणाऱया व मृतदेहाची टेम्पोने वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.शिवाजी राठोड यांनी दिली.

आरोपीने मृत पावलेल्या मावस भावाच्या मुलीला चांगल्या शिक्षणाचे आमिष दाखवून स्वत:कडे आणले होते. या मृत भावाच्या कुटुंबीयांच्या डबघाईला आलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्याने हे कृत्य केले. तसेच मुलगी मोठी झाल्यानंतर तिला वाममार्गाला लावण्याचा आरोपीचा उद्देश होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनाक्रम

हिना नवनाथ चव्हाण (रा. मु.पो. चाफेनेर ता-कन्नड, जि-औरंगाबाद) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानुसार त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलीला सहा महिन्यांपूर्वी शिक्षणासाठी नात्यातील प्रकाश उर्फ हज्जू हरी राठोड (रा. धावगी रोड, उत्तन जि-ठाणे) याच्याकडे पाठवले होते. परंतु, काही दिवसांपासून तिच्याशी संपर्क साधता येत नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवली. यानंतर उत्तान सागरी पोलिसांनी पथके तयार करुन संबंधित मुलीचा शोध सुरू केला.

यादरम्यान पोलीस पथकाने तक्रारदाराच्या दिराकडे चौकशी केल्यानंतर तो गायब असल्याचे समोर आले. तत्काळ पोलिसांनी प्रकाश राठोड कुटुंबीयांचा शोध सुरू केला. त्याची पत्नी अनिता अन्य एका नातेवाईकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये मृत मुलीला प्रकाशने शिक्षणासाठी आणल्याची त्यांनी कबूली दिली. परंतु, तिला शाळेत घातले नाही. तसेच संबंधित चिमुरडीचा घरकामासाठी वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले. घरकाम न केल्यास तिला मारहाण करत असल्याची माहिती अधिक चौकशीत समोर आली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन कसारा घाटात फेकलेला ड्रम काढला; आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी अनिता राठोड याला 09 नोव्हेंबरला आणि यानंतर आरोपी आकाश चव्हाणला 10 नोव्हेंबरला अटक करण्यात आली. सध्या न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली असून ठाणे ग्रामीण पोलीस मुख्य आरोपी प्रकाश राठोडचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण ?

भारतीला इंग्लिश पद्धतीच्या कमोडवर शौचास बसता येत नव्हते. 07 नोव्हेंबरला तिने कपड्यांमध्ये लघुशंका केली. यावेळी राग अनावर झालेल्या प्रकाशने लाथाबुक्यांनी मारहाण करुन तिचा गळा आवळला. भारती हालचाल करत नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे आरोपीच्या लक्षात आले. यानंतर आरोपी प्रकाश आणि अनिता यांनी चिमुरडीचा मृतदेह नायलॉनच्या पोत्यात बांधून प्लास्टिक ड्रममध्ये ठेवला. तसेच दुर्गंधी टाळण्यासाठी ड्रम सिमेंटने सीलबंद केला.

10 नोव्हेंबरला आरोपीचा नातेवाईक अशोक चव्हाणला बोलावून घेण्यात आले. यानंतर त्याला घडलेल्या प्रकारची माहिती देऊन 11 नोव्हेंबरला संध्याकाळी घरातील सामान काश्मीर येथे नेण्याचे सांगितले. या दोघांनी मिळून संबंधित मुलीचा मृतदेह कसारा घाटात फेकल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

Intro:Body:चांगल्या शिक्षणासाठी आपल्या निधन झालेल्या मावस भावाची ९ वर्षीय मुलीला आणून तिचा गळा दाबून निघृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेह कसारा घाटात फेकून देणाऱ्या फिर्यादीच्या मावस दिराला आणि मृतदेह नेण्यासाठी टेम्पो चालविणाऱ्या अशा दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलीस तपासात आरोपीने मृतक मावस भावाच्या डबघाईला आलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मुलीला चांगल्या शिक्षणाचा झासा देऊन आणण्यात आले होते. मुलगी मोठी झाल्यानंतर तिला वाममार्गाला नेण्याचा आरोपीचा उद्देश होता असे प्राथमिक तपासात आढळल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड यानी दिली.
हिना नवनाथ चव्हाण रा. मु.पो. चाफेनेर ता-कन्नड, जि-औरंगाबाद यांनी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत त्यांची ९ वर्षीय मुलगी कु. भारती हिला सहा महिन्यापूर्वी शिक्षणासाठी फिर्यादीचा मावस दीर प्रकाश उर्फ हज्जू हरी राठोड रा. धावगी रोड , रिद्धिसिद्धि बिल्डिंग उत्तन जि -ठाणे यांच्याकडे पाठविली होती. ती बेपत्ता झल्याच तक्रार नोंदविताच उत्तान सागरी पोलिसांनी गंभीरतेने तपस सुरु केला. पोलिसांची विविध पथके तयार करून अपहृत मुलीचा शोध सुरु केला. पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसी पुटेज, तपासले. आसपासचा परिसर, दुकानदार, बसस्टोप, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी शोध घेतला. सर्व प्रयत्न केल्यानंतर अखेर पोलीस पथक फिर्यादीच्या मावस दिराच्या घरी चौकशीसाठी पोहचले असता मावस दीर प्रकाश उर्फ ह्ज्जू राठोड परिवार हा घटनास्थळी मिळून आला नाही. पोलिसांनी राठोड फॅमिलीचा शोध सुरू केला. प्रकाश राठोड याची पत्नी अनिता राठोड रा. मौजे लोणजे ता-चाळीसगाव जि -जळगाव आणि प्रकाश राठोड यांचा नातेवाईक आकाश चव्हाण रा. मौजे केडगाव, ता-दौंड, जि -पुणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत कु भारती हिला प्रकाश याने शिक्षणासाठी आणले मात्र तिला शाळेत टाकलेच नाही. या उलट चिमुरडीला घरकामासाठी वापर करीत होते. खेळणायच्या नादात रमलेल्या चिमुरडीला घरकाम न केल्याने मारहाण करीत होते. उपाशी ठेवत होते. कु. भरती कडून प्रकाश आणि अनिता काम करून घेत असल्याने घरकामवालीचे पैसे वाचत होते. दरम्यान कु. भारती हिला शौचालयाच्या इंग्लिश कमोडवर बसून शौच करता येत नव्हते लघुशंका करता येत नव्हते. याचा राग प्रकाश आणि अनिता याना होता. ७ नोव्हेम्बर, २०१९ रोजी कु.भरती हिने चड्डीत लघुशंका केली. याचा राग अनावर झालेला प्रकाश याने भारतीला लाथाबुक्यांनी मारहाण करून तीचा गळा आवळला. भारती हालचाल करीत नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात घेऊन आरोपी प्रकाश आणि अनिता यांनी प्लॅन करून चिमुरडीचा मृतदेह नायलॉनच्या गोणीत बांधून पाण्याच्या प्लास्टिक ड्रममध्ये ठेवण्यात आला. दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यावर सिमेंटचा ठार लावून ड्रम सीलबंद केला. चार दिवासाने १० नोव्हेंबर, २०१९ रोजी प्रकाशचा नातेवाईक अशोक चव्हाण याला बोलावून घेण्यात आले. त्याला घडलेल्या प्रकारची माहिती देत ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घरातील सामान काश्मीर येथे नेण्याचे सांगून छोटा हत्ती टेम्पोने मृतदेह कसारा घाटात दरीत नेऊन फेकल्याची माहिती आरोपींची पोलिसांना दिली.
मिळालेल्या माहिती नंतर पोलीस पथकाने कसारा घाटात जाऊन फेकलेला ड्रम काढून त्यातील मृतक भारतीचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून आरोपी अनिता राठोड हिला ९ नोव्हेंबर रोजी आणि आरोपी आकाश चव्हाण याला १० नोव्हेंबर रोजी अटक करून त्यांना न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ठाणे ग्रामीण पोलीस आता मुख्य आरोपी प्रकाश राठोड याचा शोध घेत आहेत.

BYTE : शिवाजी राठोड - ग्रामीण पोलिस अधीक्षक ,ठाणेConclusion:
Last Updated : Dec 13, 2019, 9:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.