ठाणे - कळवा सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ठाण्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावदेवी कळवण देवी समितीने नववर्षानिमित्त ५० फुटांची भव्य संस्कार भारतीची रांगोळी गावदेवी मैदान, कळवा येथे काढली.
या रांगोळीतून महाराष्ट्रातील संत परंपरा साकारण्यात आली . या रांगोळीसाठी ४० ते ५० किलो रंग वापरण्यात आले आहेत. ही रांगोळी काढण्यासाठी २५ स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
ठाण्यात गुढीपाडव्याचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. यानिमित्त शोभायात्रा काढली जाते. त्याआधी रांगोळी काढून मराठी नूतन वर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.