ETV Bharat / state

पनवेल महापालिका क्षेत्रात आज कोरोनाचे १९ नवे रुग्ण तर, ४४ जणांना डिस्चार्ज - पनवेल महानगरपालिका कोरोना रुग्णसंख्या

पनवेल महापालिका क्षेत्रात आज(रविवार) कोरोनाचे १९ नवे रुग्ण आढळून आले असून ४४ कोरोनामुक्त व्यक्तींना आज सुट्टी देण्यात आली आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे २५३ रुग्ण उपचार घेत आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १९ नवे रूग्ण;

author img

By

Published : Jun 7, 2020, 9:15 PM IST

नवी मुंबई - पनवेल महापालिका क्षेत्रात आज (रविवार) १९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे तब्बल ४४ रुग्ण बरे झाल्याने त्यांनारुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज पनवेल क्षेत्रात आढळून आलेल्या १९ रुग्णांमध्ये कामोठ्यातील ८, पनवेलमधील ३, कळंबोलीतील १, रोडपालीतील १, खिडुकपाडा येथील २, नवीन पनवेलमधील २, खांदा कॉलनीतील १ तसेच तळोजा फेज-१ मधील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच, पनवेल महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत नोंद झालेल्या एकूण ७१२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे २५३ रुग्ण उपचार घेत आहेत.

कामोठे येथील सेक्टर-२५, जिओ मॅट्रीक्स सिल्वर क्रेस्ट सोसायटीतील ४८ वर्षीय महिलेचा कोरोनामुळए मृत्यू झाला आहे. या महिलेला आधीपासूनच रक्तदाब व फुफ्फुसाचा आजार असल्याची माहिती पनवेल महापालिका प्रशासनाने दिली आहे. तर, आज पनवेल महापालिका क्षेत्रातील ४४ जण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये कामोठ्यातील १६, खारघरमधील १२, नवीन पनवेलमधील ११, पनवेलमधील ३ तर कळंबोलीतील २ रुग्णांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.