ETV Bharat / state

ऑनलाइन शिक्षण : अनलिमिटेड डाटा पॅकसाठी विद्यार्थ्यांना मिळणार एक हजार रुपये; नवी मुंबई मनपाचा उपक्रम - online education data pack money

मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून पुढाकार घेत आहे. मात्र, काही पालकांना आपल्या मुलांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्याकरिता मोबाईलमध्ये आवश्यक असलेला नेटचा अनलिमिटेड डाटा पॅक टाकणे आर्थिक स्थितीमुळे शक्य होत नाही.

online education
ऑनलाइन शिक्षण
author img

By

Published : Jun 7, 2021, 10:51 AM IST

नवी मुंबई (ठाणे) - आगामी 2021-22 या शैक्षणिक वर्षात किमान पहिल्या सहामाहीत शाळा प्रत्यक्ष वर्गात न भरवता ऑनलाइन शिक्षण पध्दत सुरू राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नवी मुंबई मनपा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अनलिमिटेड नेट पॅकसाठी 1 हजार रूपये जमा करण्यात येणार आहे. नवी मुंबई मनपाचे आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबतची माहिती दिली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना व आरोग्य सुविधांची काळजी घेतली जात आहे.

आर्थिक स्थितीमुळे अनलिमिटेड डाटा पॅक टाकणे पालकांना शक्य होत नाही -

मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून पुढाकार घेत आहे. मात्र, काही पालकांना आपल्या मुलांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्याकरिता मोबाईलमध्ये आवश्यक असलेला नेटचा अनलिमिटेड डाटा पॅक टाकणे आर्थिक स्थितीमुळे शक्य होत नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा - वांद्र्यातील इमारतीचा काही भाग कोसळला; एकाचा मृत्यू तर पाच जखमी

मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांची करणार सोय -

महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता विद्यार्थ्यांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. 2021 - 22 या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सहामाही करिता नेटच्या अनलिमिटेड डाटा पॅकसाठी हे पैसे खात्यात जमा केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले आहे. तसेच ज्या मुलांच्या पालकांकडे मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नही करण्यात येत आहे.

कृती पुस्तिका उपलब्ध -

यावर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासोबतच कृती पुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कृती पुस्तिकांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येईल. दर 15 दिवसांनी संबंधित शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्याने अभ्यास केलेली कृती पुस्तिका त्याच्याकडून घेतील व पुढील अभ्यासाची कृती पुस्तिका त्याला उपलब्ध करून देतील. त्यामुळे विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे मूल्यमापनही करता येणे शक्य होईल.

स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य घेणार -

याशिवाय ऑनलाइन वर्गात काही विद्यार्थ्याकडून मोठ्याने पाठ वाचन करून घेणे, जेणकरून योग्य वाचनाची व उच्चारांची सवय होईल आणि समुहात वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास होईल. त्याचप्रमाणे विविधांगी उपक्रमशील शिक्षण पध्दती राबविणे अशा नाविन्यपूर्ण संकल्पना साकारण्यात येणार आहे. यामधून आनंददायी व सर्वांगीण विकास करणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यावर भर दिला जाणार आहे. ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत उत्तम काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य यामध्ये घेतले जाणार आहे.

35 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा -

नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन शिक्षण पध्दत राबवून त्यांचा शैक्षणिक विकास थांबणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. यामुळे डेटा पॅकसाठी आर्थिक मदत देणाऱ्या महानगरपालिकेच्या या निर्णयाचा 35 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा - लोकल मोटरमनच्या सतर्कतेमुळे वाचला आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचा जीव, घटना सीसीटीव्हीत कैद

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.