ठाणे - कल्याण डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच असून, गेल्या २४ तासात नव्याने ४७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आजच्या रुग्णांमध्ये डोंबिवलीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. तर रुग्णांची एकूण संख्या १ हजार २७५ वर जाऊन पोहचली आहे.
आतापर्यंत ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ५९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या स्थितीत ६४६ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. गुरूवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये २ अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची विभागणी पाहता डोंबिवली पूर्व आणि पश्चिममध्ये १६, कल्याण पूर्व आणि पश्चिममध्ये २६ तर टिटवाळा परिसरात ४ आणि ग्रामीण मधील पिसवली गावात १ असे ४७ रुग्ण आढळून आले आहेत.