ETV Bharat / state

गुटखा दिला नाही म्हणून शेजाऱ्यावर चाकूने वार; हल्लेखोर फरार - Gutkha assailants absconded

ठाण्यात गुटखा नाही, असे बोलताच संतप्त झालेल्या तरुणाने त्या शेजाऱ्यावर धारदार चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी केले (Neighbor stabbed for not giving Gutkha). ही घटना डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर तरुणावर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे (Gutkha assailants absconded).

गुटखा दिला नाही म्हणून  शेजाऱ्यावर चाकूने वार

author img

By

Published : Sep 7, 2022, 10:23 PM IST

ठाणे : शेजारच्या तरुणाने गुटखा खाण्यास मागितला. मात्र आपण गुटखा खात नाही. आपल्याजवळ गुटखा नाही, असे बोलताच संतप्त झालेल्या तरुणाने त्या शेजाऱ्यावर धारदार चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर तरुणावर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. अजय बलवीर बोथ ( वय, २२, रा. त्रिमूर्तीनगर) असे फरार हल्लेखोराचे नाव आहे. तर स्वतंत्रसिंग आवदलाल सिंग ( वय ३०, रा. सिताबाई चाळ, त्रिमूर्तीनगर) असे जखमी तक्रारदाराचे नाव आहे.

गुटखा मिळत नाही म्हणताच चाकूने वार - जखमी स्वतंत्रसिंग त्रिमूर्तीनगरमध्ये कुटूंबासह राहून तो सुतारकाम करतो. त्यातच सोमवारी रात्री नऊ वाजता जेवण झाल्यानंतर स्वतंत्रसिंग हा आपल्या घराबाहेर फेऱ्या मारत होता. यावेळी तेथे त्याच्या शेजारी राहणारा आरोपी अजय बोथ समोर येऊन त्याने स्वतंत्रसिंग याला थांबवून तुझ्याजवळ गुटखा आहे ना, तो खाण्यासाठी दे, अशी मागणी केली. मात्र सिंग याने आपण गुटका खात नाही. आपल्याजवळ गुटखा नाही. गुटक्यावर शासनाची बंदी असल्याने तो कोठे मिळत नाही, असे अजयला सांगितले. सिंग याच्या या बोलण्याचा अजयला राग आला. सिंग हा आपणाशी खोटे बोलत आहे. त्याच्याजवळ गुटखा असूनही तो आपणास देत नाहीत, असा गैरसमज करत अजयने जवळील धारधार चाकूने सिंग याला काही कळण्याच्या आता रागाच्या भरात त्याच्यावर वार केले.

फरार आरोपीचा शोध सुरू - चाकू हल्ल्यात सिंग गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. तोपर्यंत आरोपी अजय घटनास्थळावरुन पळून गेला होता. जखमी अवस्थेत सिंग यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करुन फरार आरोपी अजयचा शोध सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.