ठाणे: शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले होते. विशेष म्हणजे सलग तीन दिवसांपासून राष्ट्रवादी पार्टीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्ते घोषणा देत पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी शेकडो कार्यकर्ते आंदोलन करत होते. त्यामध्ये आज कार्यलयाबाहेर राष्ट्रवादी युवकचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष अजित झा यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली होती.
निराशातून आत्मदहन करण्याचा प्रयत्न: अजीत झा यांच्याकडे आत्मदहन करण्याविषयी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले कि, शरद पवार हे आमच्या वडिलां समान आहेत. जर वडिलांचा हात आमच्या डोक्यावरून निघून गेला. तर आमच्यासाठी पक्ष काहीच नाही. सर्व काही पवार साहेब आहेत. त्यामुळे आमचे जीवन व्यर्थ आहे. यामुळे निराशातून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले.
आत्मदहन करण्याचा केला प्रयत्न: तिसऱ्या दिवशीही पक्ष नेत्यांची बैठक सुरू असतानाच पक्षाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. हातात फलक घेऊन हे कार्यकर्ते जोरदार घोषणा देत होते. मात्र यावेळी अजित झा या भिवंडीतील राष्ट्रवादी युवक अध्यक्ष याने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर कार्यकर्त्यांनी त्याला रोखले आणि मोठा अनर्थ होण्यापासून टळला. मात्र या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या गोटा तणावाचे वातावरण पसरले होते.
शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला: दरम्यान शरद पवार यांनी २ मे रोजी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. दुसरीकडे राष्ट्वादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन, उपोषण करत शरद पवार यांच्या राजीनामा निर्णयाला विरोध केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या निवड समितीने आज शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी निवड समिती आणि कार्यकर्ताचा आदर करत राजीनामा मागे घेल्याचे आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. शरद पवारांच्या घोषणेनंतर पेढे वाटून राष्ट्रवादीच्या कर्यकर्त्यांनी ढोल-ताशा वाजवत जल्लोष साजरा केला.
हेही वाचा: Sharad Pawar Resignation Withdraw राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच