ETV Bharat / state

कोरोनामुळे अनाथ झालेल्या तरुणीला राष्ट्रवादीने दिली नोकरी

author img

By

Published : Jun 21, 2021, 10:46 PM IST

ठाण्यातील दिव्या शर्मा (19 वर्षे) या विद्यार्थिनीने आपला एकमेव आधार असलेल्या आईला कोरोनामुळे गमावले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने तिला आधार दिला. आईचे निधन झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या दिव्याला राष्ट्रवादीकडून नोकरी देण्यात आली. खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते आज दिव्याला ऑफर लेटर देण्यात आले.

thane
thane

ठाणे - कोरोना महामारीच्या काळात अनेक भयानक घटना समोर आल्या. यामध्ये कोणाची नोकरी गेली, तर कोणचा व्यवसाय बंद झाला. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेकजण अनाथही झाले. ठाण्यातील एक 19 वर्षीय तरुणीही अनाथ झाली आहे. तिच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. आता आपला एकमेव आधार असलेल्या आईलाही कोरोनामुळे तिने गमावले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने तिला आधार दिला आहे. शिवाय, आईचे निधन झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या ठाण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला राष्ट्रवादीकडून नोकरीही देण्यात आली आहे. दिव्या शर्मा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती कोपरी येथे राहते.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या तरुणीला राष्ट्रवादीने दिली नोकरी

सुप्रिया सुळेंच्या हस्ते ऑफर लेटर

सोमवारी (21 जून) दिव्याच्या नोकरीचा पहिला दिवस असल्याने आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात तिला ऑफर लेटर देण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, रोजगार स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रदेश प्रमुख डॉ. ओमकार हरी माळी यांच्या पुढाकाराने दिव्याला रोजगाराची संधी देण्यात आली.

'मायेचा संवाद'मध्ये दिव्याची नोकरीसाठी विनवणी

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांशी १४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मायेचा संवाद साधण्यात आला. यावेळी दिव्या हिने महिला व बालविकास मंत्री आणि तेथे उपस्थित अधिकारी यांना 'मला आर्थिक मदत नको, माझ्या पुढील भविष्यासाठी मला नोकरी द्या' अशा शब्दांत विनवणी केली. डॉ. ओमकार हरी माळी यांनादेखील नोकरीसाठी विचारणा केली. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता दिव्याशी संपर्क साधला आणि नियमाप्रमाणे मुलाखत घेऊन तिची नोकरी पक्की केली. दिव्याला २१ जून रोजी रुजू होण्यास सांगितल्याने या नोकरीचे ऑफर लेटर तिला सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी दिव्याची मामी सुनीता शर्मा यादेखील उपस्थित होत्या. याबद्दल दिव्या आणि तिच्या मामीने आनंद व्यक्त केला.

हेही वाचा - मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटकरी घायाळ, सोशल मीडियावर केवळ स्मृतीचीच चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.