ETV Bharat / state

४ हजार ४१४ किलो जनावरांचे मांस भरलेला टेम्पो पकडला; नयानगर पोलिसांची कारवाई - मीरा-भाईंदर बेकायदा जनावरांचे मास

मीरा-भाईंदर शहरात या अगोदरदेखील बेकायदेशीर मांसाची विक्री वाहतूक कत्तल होत असल्याचे उघड झाले आहे. मात्र. मीरा-भाईंदर शहरातील पोलीस कर्मचारी, मनपातील आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, आर्थिक बाबी तडजोड करून मदत केली जाते.

मीरा-भाईंदर
मीरा-भाईंदर
author img

By

Published : Nov 28, 2020, 8:37 PM IST

मीरा-भाईंदर (ठाणे) - मीरा रस्त्याच्या शीतलनगर परिसरात नाकाबंदी असताना अंदाजे चार टन जनावरांचे मास बेकायदा विक्री करण्यासाठी आलेला टेम्पो जप्त करण्यात आला. नया नगर पोलिसांनी चालकासह त्याच्या एका साथीदाराला अटक करून गुन्हा दाखल केला.

नयानगर पोलिसांची कारवाई

मीरा-भाईंदर शहरात या अगोदरदेखील बेकायदेशीर मांसाची विक्री वाहतूक कत्तल होत असल्याचे उघड झाले आहे. मात्र. मीरा-भाईंदर शहरातील पोलीस कर्मचारी, मनपातील आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, आर्थिक बाबी तडजोड करून मदत केली जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात मांस शहरात येतेच कसे? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. नयानगर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान चार टन जनावरांचे मांस भरलेला टेम्पो पकडला. दोन जणांना अटक देखील केली आहे. मात्र, हे नेमके आले कुठून? यांचा मुख्य सूत्रधार कोण आहे? ही बेकायदेशीर कत्तल होते कुठे? यांचा खोलात जाऊन तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे.

मोठ्या प्रमाणात जनावरांच्या मांसाची विक्री

मीरा रस्त्याच्या नयानगर परिसरात मोठ्या प्रमाणात जनावरांच्या मांसाची विक्री केली जाते. परंतु, आजपर्यंत कोणत्याच विभागाचा अधिकारी कर्मचारी दुकानात जाऊन तपासणी करताना दिसले नाहीत. बीफ संदर्भात तपासणी करणे गरजेचे आहे की, बेकायदेशीर कत्तल करून विक्रीसाठी आणले आहे का..?. या अगोदर पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केल्या आहेत. मात्र, याचा खरा तपास पोलिसांनी केला तर मोठ्या रॅकेटचा छडा लागेल, बेकायदेशीर मांस विक्री कत्तल करणे याचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे.

या कारवाईत नयानगर पोलिसांनी अस्लम शेख, रहेमुद्दीन कुरेशी अशा दोन जणांविरोधात महाराष्ट्र पशुसंवर्धन सुधारित कायदा २०१५ चे कलम ५ क, ९ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मीरा-भाईंदर वसई विरार परिमंडळ १ चे उपायुक्त अमित काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.