ठाणे - नवी मुंबई व पनवेलमध्ये घराघरात दिवे, पणत्या मेणबत्या पेटवण्या आल्या. तर, मोबाइलच्या फ्लॅशलाइट्सने शहर लखलखले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू केले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील विजेवर चालणार प्रकाशदिवे बंद करून मेणबत्ती, दिवे, मोबाईलची टॉर्च किंवा फ्लॅश लावण्याचे आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील विजेचे दिवे बंद करून घराच्या दारात किंवा बाल्कनीमध्ये दिवे लावावे किंवा मोबाइल बॅटरी सुरू करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी संपूर्ण देशाला केले होते. त्यांच्या या आवाहनाला रविवारी रात्री ९ वाजता नवी मुंबई व पनवेलकर यांनी उत्तम प्रतिसाद दिला. घराघरात दिवे,पणत्या पेटल्या होत्या. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्स सुरू केले होते.व संपूर्ण शहर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात लखलखले होते.