ETV Bharat / state

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी भूमीपुत्रांचे मानवी साखळी आंदोलन

author img

By

Published : Jun 11, 2021, 12:57 PM IST

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी भूमीपुत्रांचे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी . जो पर्यंत विमानतळाला दि बांचे नाव दिले जाणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया भूमिपुत्र फाऊंडेशन अध्यक्ष सुशांत पाटील यांनी दिली.

Navi Mumbai International Airport A human chain agitation of Bhumiputras was organized to demand naming of  D.B Patil
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी भूमीपुत्रांचे मानवी साखळी आंदोलन

वसई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे. नवी मुंबईत तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी स्थानिक भूमीपुत्रांनी केली आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पालघर व मिरा भाईंदर येथील भूमिपुत्र एकत्र येत गुरुवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील फाऊंटन येथे मानवी साखळी आंदोलन केले.

विमानतळाच्या नामांतराच्या प्रश्नावरून स्थानिक भूमिपुत्र आक्रमक -

माजी खासदार दि बा पाटील यांनी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त व येथील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारला होता. यामुळे नवी मुंबईत तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी अनेकदा सरकार दरबारी केली आहे. मात्र, विमानतळाचे काम प्राथमिक स्तरावर सुरू झाले असतानाच सिडको संचालक मंडळाने या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी मंजूर करून राज्य मंत्री मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे विमानतळाच्या नामांतराच्या प्रश्नावरून स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत.

मानवी साखळी आंदोलन -

रायगड, नवी मुंबई, ठाणे व पालघर या जिल्ह्यांतून दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील फाऊंटन येथे एकत्र येत मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वसई विरार, ठाणे, मीरा भाईंदर या भागातील शेकडोच्या संख्येने भूमिपुत्र सहभागी झाले होते. विमानतळाला दि बा पाटलांचेच नाव द्या असे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. दि बा पाटील यांनी स्थानिक भूमीपुत्रांच्यासाठी केलेले कार्य हे मोठे असून त्यांना त्याचा मान मिळाला पाहिजे. जो पर्यंत विमानतळाला दि बांचे नाव दिले जाणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया भूमिपुत्र फाऊंडेशन अध्यक्ष सुशांत पाटील यांनी दिली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.