नवी मुंबई - भाजपाने महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील ओबीसींची दिशाभूल केली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष असून, आम्ही सर्वांना समान संधी देतो असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
'मी फक्त 3 वर्षासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राहणार' -
काँग्रेस पक्षात संघटनात्मक ढाचा हा उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन असा नसून सर्वसमावेशक आहे. काँग्रेस पक्षात सर्वाना संधी मिळावी याकडे कल असतो. आमच्या पक्षात माझ्यापेक्षा कित्येक वरीष्ठ नेते आहेत. मला कोणी गॉडफादर नाही. मात्र, तरीही मला प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे. याचा अर्थ असा होत नाही की, मी मोठा आहे, आमच्याकडे कोणतेही मतभेद नाहीत. एक पक्ष म्हणून आम्ही संघटित असून एकत्रित बांधले आहोत, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. या पदावर मी ही तीन वर्ष राहणार आहे. नवीन नेतृत्वाला संधी मिळावी अशी नेहमीच काँगेसची भूमिका आहे.
'विरोधीपक्ष नेते ओबीसींची दिशाभूल करत आहेत' -
विरोधपक्ष नेते महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण देशातील ओबीसींची दिशाभूल करत आहेत. वाशीमधील काँग्रेस भवनच्या उद्घाटन प्रसंगी नाना पटोलेंनी हे वक्तव्य केले आहे. खोट बोला पण रेटून बोला असा पवित्रा भाजपाचा आहे, असाही निशाणा नाना पटोले यांनी भाजपावर साधला.