ठाणे - अनैसर्गिक अत्याचाराच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या नराधमाला जामीन मिळावा यासाठी तो गुन्हा मागे घेण्याच्या वादातून ६ जणांच्या टोळक्यांनी एकाची निर्घृण हत्या केल्याची केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मोहम्मद अक्रम अकबर अली अन्सारी (वय ४८) असे मृताचे नाव आहे.
दरम्यान, पोलिसांनी सातही हल्लेखोरांना गजाआड केले आहे. एस्तिकार सय्यद, अम्मू अबूशमा सय्यद, .इस्माईल अन्सारी, इब्राहिम अन्सारी, इसराइल अन्सारी, वसीम, आणि शेरू असे आरोपींची नावे आहेत.
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत मोहम्मद अक्रम कुटुंबासह राहत होता. याच परिसरात हत्येतील मुख्य आरोपी एस्तिकार सय्यद राहतो. गेल्या वर्षी मृताच्या अल्पवयीन पुतण्यावर आरोपीचा भाऊ नराधम अख्तर सय्यद याने भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जनस्थळी बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला होता. त्यावेळी पीडित मुलाने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नराधम अख्तर सय्यदवर गुन्हा दाखल केला. यानंतर त्याला करण्यात आली. तेव्हापासून आरोपी अख्तर सय्यद हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याने जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, न्यायालयातुन त्याला जामीन नाकारण्यात आला आहे.
त्यातच भावाला जामीन मिळत नसल्याचे पाहून मुख्य आरोपी एस्तिकार सय्यद याने त्याच्या ६ साथीदारांसह मृत मोहम्मद अन्सारी हा शनिवारी रात्रीच्या सुमाराला घरी जात असताना त्याला रस्त्यातच गाठून 'मेरे भाई का जामीन नहीं हो रहा है' असे बोलला. यावेळी मृताने 'जो होगा वो कोर्ट में देखेंगे' असे म्हणाले. याचवेळी मुख्य आरोपी इसतिकार याने साथीदारांच्या मदतीने मोहम्मद अन्सारी यांच्यावर लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केले.
मोहम्मद रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचे पाहून सातही हल्लेखोरांनी घटनास्थळावून पळ काढला होता. तर गंभीर जखमी अवस्थेत मोहम्मद अन्सारी यांना नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्नालयात दाखल केले असता रविवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, शांतीनगर पोलिसांनी आदी सातही हल्लेखोरांविरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. रविवारी त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तर अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.
धक्कादायक ! अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्याच्या वादातून एकाची हत्या - Thane shanti nagar police station
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत मोहम्मद अक्रम कुटुंबासह राहत होता. याच परिसरात हत्येतील मुख्य आरोपी एस्तिकार सय्यद राहतो. गेल्या वर्षी मृताच्या अल्पवयीन पुतण्यावर आरोपीचा भाऊ नराधम अख्तर सय्यद याने भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जनस्थळी बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला होता.