ETV Bharat / state

रस्ता रुंदीकरणावरून मुंब्र्यात तणाव; नागरिकांनी पालकमंत्री शिंदेंना घातला घेराव - Parents Minister

रस्ता रुंदीकरण ही जनतेची मागणी असल्याने पालकमंत्र्यांचा वापर करून नईम खान हे द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत सुमारे दीड ते दोन हजार नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिकांनी नईम खान यांचा निषेध केला. त्यामुळे संतप्त जमावाला पालकमंत्र्यांना सामोरे जावे लागले.

रस्ता रुंदीकरणावरून मुंब्र्यात तणाव; नागरिकांनी पालकमंत्री शिंदेंना घातला घेराव
author img

By

Published : Mar 31, 2019, 10:38 PM IST

ठाणे - रस्ता रुंदीकरणाच्या मुद्यावर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न मुंब्रा येथील राजकीय पुढाऱ्यांनी केला आणि त्यामुळे मुंब्रा भागात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना यावे लागले होते. मात्र, स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यानी याबाबत विरोध करत रुंदीकरणाचा प्रयत्न उधळून लावला. रस्ता रूंदीकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण आणू नये, अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे.

मुंब्रा-कौसा येथील दर्गाह रोड अत्यंत अरुंद असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात होती. त्यानुसार हे रुंदीकरण करण्यात येत आहे. या रुंदीकरणादरम्यान काही दुकाने आणि भिंती पाडण्यात आल्या. हाच मुद्दा धरून काही राजकारण्यांनी वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरवला.

रस्ता रुंदीकरण ही जनतेची मागणी असल्याने पालकमंत्र्यांचा वापर करून नईम खान हे द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत सुमारे दीड ते दोन हजार नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिकांनी नईम खान यांचा निषेध केला. त्यामुळे संतप्त जमावाला पालकमंत्र्यांना सामोरे जावे लागले. या जमावात सहभागी असलेल्या हिंदू आणि मुस्लीम बांधवांनी रस्ता रुंदीकरण महत्त्वाचे असल्याचे नमूद केल्याने अवघ्या मिनिटभरातच पालकमंत्र्यांना माघारी फिरावे लागले.

यासंदर्भात व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मयूर सारंग यांनी सांगितले की, गेली ४० वर्षे आम्ही हिंदू - मुस्लीम गुण्यागोविंदाने नांदत आहोत. ४० वर्षे या भागाकडे कोणाचेही लक्ष नव्हते. आता या भागाचा विकास झाला आहे. या विकासाला आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते. या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. तसेच आडोश्याला बसून गर्दुल्ले असामाजिक कृत्य करत होते. आता येथील नागरिकांची वाहतूक कोंडीतून तसेच गर्दुल्ल्यांच्या तावडीतून सुटका होणार असताना राजकीय हेतूने नईम खान यांनी विरोध करून द्वेष निर्माण करणे चुकीचे आहे. शिवाय, पालकमंत्र्यांनीही माहिती न घेता येथे येणे हे विकासात अडथळा निर्माण करण्यासारखेच आहे. यामुळेच शांतताप्रिय नागरिकांनी आज येथे जमा होऊन निषेध नोंदवला आहे. पालकमंत्र्यांनीही अशावेळी पोलीस ठाण्यात बैठक घेणे गरजेचे होते असे या वेळी नागरिकांनी सांगितले.

Intro:रस्ता रुंदीकरणावरून मुंब्रा येथे तणाव नागरिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना घातला घेरावBody:

रस्ता रुंदीकरणाच्या मुद्यावर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न मुंब्रा येथील राजकीय पुढार्यांनी केला आणि त्यामुळे मुंब्रा भागात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना यावे लागले होते . मात्र स्थानिक नागरिक आणि व्यापार्यांनी याबाबत विरोध करत रुंदीकरणाचा प्रयत्न उधळून लावला. आतापर्यंत वर्षानुवर्षे मुंब्रा भागात राहणाऱ्या जनतेने हे सर्व प्रयत्न निष्काम ठरवले.
मुंब्रा-कौसा येथील दर्गाह रोड अत्यंत अरुंद असल्याने या रस्याचे रुंदीकरण करण्याची मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात होती. त्यानुसार हे रुंदीकरण करण्यात येत आहे. या रुंदीकरणादरम्यान काही दुकाने आणि भिंती पाडण्यात आल्या. हाच मुद्दा धरून काही राजकारण्यांनी वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरवला. रस्ता रुंदीकरण ही जनतेची मागणी असल्याने पालकमंत्र्यांचा वापर करून नईम खान हे द्वेषाचे राजकारण करीत असल्याचा आरोप करीत सुमारे दीड ते दोन हजार नागरिक रस्त्यावर उतरले. या नागरिकांनी नईम खान यांचा निषेध केला. त्यामुळे या संतप्त जमावाला पालकमंत्र्यांना सामोरे जावे लागले. या जमावात सहभागी असलेल्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी रस्ता रुंदीकरण महत्वाचे असल्याचे नमूद केल्याने अवघ्या मिनिटभरातच पालकमंत्र्यांना माघारी फिरावे लागले.
यासंदर्भात व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मयूर सारंग यांनी सांगितले की, गेली ४० वर्षे आम्ही हिंदू - मुस्लीम गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ४० वर्षे या भागाकडे कोणाचेही लक्ष नव्हतं. आता या भागाचा विकास झाला आहे. या विकासाला आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते. या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. तसेच आडोश्याला बसून गर्दुल्ले असामाजिक कृत्य करत होते. आता येथील नागरिकांची वाहतूक कोंडीतून तसेच गर्दुल्ल्यांच्या तावडीतून सुटका होणार असताना राजकीय हेतूने नईम खान यांनी विरोध करून द्वेष निर्माण करणे चुकीचे आहे. शिवाय, पालकमंत्र्यांनीही माहिती न घेता येथे येणे हे विकासात अडथळा निर्माण करण्यासारखेच आहे. त्यामुळेच शांतताप्रिय नागरिकांनी आज येथे जमा होऊन निषेध नोंदवला आहे. पालकमंत्र्यांनीही अशावेळी पोलीस ठाण्यात बैठक घेणे गरजेचे होते असं या वेळी नागरिकांनी सांगितले . Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.