नवी मुंबई - वाशी स्थानकासमोरील रिअल टेक इमारतीला आज दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
संबंधित इमारतीत मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट कार्यालये आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे इमारतीत फारसे कोणी नव्हते. शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग लागल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.