ETV Bharat / state

कळवा-ऐरोली 'एलिव्हेटेड रेल्वे मार्ग' लवकरच... खासदार राजन विचारेंची माहिती

author img

By

Published : Oct 18, 2020, 10:44 PM IST

कल्याण डोंबिवली व त्यापुढील लोकल रेल्वे स्थानकावरून नवी मुंबईत येणाऱ्या व नवी मुंबईतून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे रेल्वे स्थानकात गाडी बदलावी लागत होती. मात्र आता कळवा-ऐरोली हा एलिव्हेटेड रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी खासदार राजन विचारे यांनी सिडको आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक नवी मुंबईत घेतली.

kalwa to airoli railway
कळवा-ऐरोली 'एलिवेटेड रेल्वे मार्ग' लवकरचं...खासदार राजन विचारेंची माहिती

नवी मुंबई - कळवा ते ऐरोली एलिव्हेटेड मार्गासाठी साडेचार हजार चौ.मी. जमीन मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्याचा निर्णय सिडकोच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली व पुढील लोकल प्रवासासाठी नवी मुंबईतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यामुळे ठाणे रेल्वेस्थानकाचा भार देखील कमी होणार आहे. या प्रकल्पातील अडथळा दूर झाला असून, हस्तांतरणाची प्रक्रिया सिडको व रेल्वे या दोन्ही प्राधिकरणांच्या माध्यमातून लवकरच सुरू केली जाणार आहे.

कल्याण-डोंबिवली व त्यापुढील लोकल रेल्वे स्थानकांवरून नवी मुंबईत येणाऱ्या व नवी मुंबईतून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे रेल्वे स्थानकात गाडी बदलावी लागत होती. मात्र आता कळवा-ऐरोली हा एलिव्हेटेड रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी खासदार राजन विचारे यांनी सिडको आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक नवी मुंबईत घेतली.

या प्रकल्पासाठी एमआयडीसी आणि राज्य सरकारने आपली जमीन रेल्वेकडे हस्तांतरित केली आहे. मात्र सिडकोचे जमीन हस्तांतरण अजूनही झाले नाही. ही जमीन तात्काळ हस्तांतरित करावी, अशी सूचना राजन विचारे यांनी सिडको प्रशासनाला केली होती. त्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करण्याचे आदेश सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी प्रशासनाला दिले.

डिसेंबर 2021 पर्यंत दिघा रेल्वे स्थानक सुरू होणार असून कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे मार्ग आणि दिघा रेल्वेस्थानक या दोन्ही प्रकल्पांमध्ये असलेले अडथळे दूर झाले आहेत. एलिव्हेटेड मार्गासाठी सिडकोच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.