ETV Bharat / state

यंदाची निवडणूक शिवसेना विरुद्ध गद्दार - राजन विचारे - लोकसभा निवडणूक

लोकसभा युतीचा उमेदवार म्हणून घोषणा होताच त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाण्यात वातावरण तापलेले आहे. यंदाची निवडणूक शिवसेना विरुद्ध गद्दार अशी होणार आहे. असे विधान करून त्यांनी एक प्रकारे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना डिवचले आहे.

खासदार राजन विचारे
author img

By

Published : Mar 23, 2019, 12:22 AM IST

ठाणे - यंदाची निवडणूक शिवसेना विरुद्ध गद्दार अशी होणार आहे. आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटना पाठीशी असल्याने यावेळी पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येईन, असे वक्तव्य खासदार राजन विचारे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्यातील निवडणूक यंदा चांगलीच गाजणार असे दिसत आहे.

खासदार राजन विचारे

लोकसभा युतीचा उमेदवार म्हणून घोषणा होताच त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाण्यात वातावरण तापलेले आहे. यंदाची निवडणूक शिवसेना विरुद्ध गद्दार अशी होणार आहे. असे विधान करून त्यांनी एक प्रकारे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना डिवचले आहे. दुसरीकडे मात्र मनसेची साथ आणि राजन विचारे विरोधी ठाणे महापालिकेचे २३ भाजप नगरसेवक आहेत. त्यांच्यामुळे विचारे यांना वाटणारी निवडणूक वाटते तितकी सोपी नसल्याचे चित्र सध्या ठाण्यात निर्माण झाले आहे. भाजप नगरसेवकाविरोधात दाखल केलेले गुन्हे. तसेच आपल्या नातेवाईकांसाठी भाजप नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्यामुळे ठाणे लोकसभा निवडणुकीत राजन विचारे विरुद्ध नाराज भाजप नगरसेवक अशी लढत होणार असल्याचेही बोलले जात आहे.

Intro:राष्ट्रवादी च्या उमेदवार आनंद परांजपे यांना गद्दार म्हणत राजन विचारे यांनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंगBody:Anchor : लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापू लागलंय त्यातच आता ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ठाण्यातील निवडणूक यंदा चांगलीच गाजणार असं दिसतय... राजन विचारे यांनची ठाणे लोकसभा युतीचा उमेदवार म्हणून घोषणा होताच त्यांनी केलेल्या वक्तयावरुन ठाण्यात वातावरण तापलय... “यंदाची निवडणूक ही शिवसेना विरुद्ध गद्दार अशी असून आरएसएस आणि हिंदूत्ववादी संघटना माझ्या पाठीशी असल्याने मी यावेळी पुन्हा एकदा रेकाॅर्ड ब्रेक मतांनी निवडून येईन” असं वक्तव्य करुन विद्यमान खासदार राजन विचारे यांनी एक प्रकारे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना डिवचलय... तर दुसरीकडे मात्र मनसेची साथ आणि राजन विचारे विरोधी ठाणे महानगरपालिकेचे २३ भाजपा नगरसेवक यांच्यामुळे राजन विचारे यांना ही निवडणूक वाटते तितकी सोपी नसल्याचे चित्र सध्या ठाण्यात निर्माण झालंय... भाजपा नगरसेवकां विरोधात दाखल केलेले गुन्हे आणि आपल्या नातेवाईकांसाठी भाजपा नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्यामुळे ठाणे लोकसभा निवडणूकीत राजन विचारे विरुद्ध नाराज भाजपा नगरसेवक अशी लढत होणार यांत काही शंकाच नाही...

बाईट १ : राजन विचारे, खासदार, शिवसेनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.