ETV Bharat / state

'कर्नाळा बँकेत किमान एक हजार कोटींचा घोटाळा' - कर्नाळा बँक घोटाळा नवी मुंबई लेटेस्ट बातमी

माजी आमदार विवेक पाटील कर्नाळा बँकेत शेकापच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बोगस कर्ज खाती तयार केली. तसेच त्यांच्या संचालक मंडळाने 513 कोटी रुपये इतका प्रचंड अपहार केला. परिणामी बँकेचे दिवाळे निघाले. आणखीही अशी खाते असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा आकडा हजार कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

kirit somayya, former mp
किरीट सोमय्या, माजी खासदार
author img

By

Published : Jan 19, 2020, 5:26 PM IST

नवी मुंबई - शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्नाळा नागरी सहकारी बँकेत संचालक मंडळाने केलेल्या बेकायदेशीर आणि अनागोंदी कारभारामुळे 513 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. हा घोटाळा किमान एक हजार कोटी रुपयांचा असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विवेक पाटील यांनी परदेशात पळ काढण्यापूर्वी त्यांचा पासपोर्ट जप्त करावा, तसेच त्यांची अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी व्हावी, अशी मागणी करत या घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती माजी खासदार आणि प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोठ्या प्रमाणात असलेल्या या घोटाळ्यामुळे एक लाख लोकांवर याचा परिणाम होणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.

माजी खासदार किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद
सोमय्या यांनी पुढे सांगितले, माजी आमदार विवेक पाटील कर्नाळा बँकेत शेकापच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बोगस कर्ज खाती तयार केली. त्यांच्या संचालक मंडळाने 513 कोटी रुपये इतका प्रचंड अपहार केला. परिणामी बँकेचा दिवाळे निघाले. आणखीही अशी खाते असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा आकडा हजार कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - कसा का होईना पण मी चारवेळा उपमुख्यमंत्री - अजित पवार

ठेवीदार आणि खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाही. मात्र, बँकेकडून फक्त आश्वासने, दमदाटी केली जात असल्याने ठेवीदार चिंतेत आहेत. अनेक ठेवीदारांचा या धसक्याने मृत्यूही झालेला आहे. अशा वेळी बँकेने त्यांना योग्य मार्गदर्शन करून वेळेवर त्यांचे पैसे देणे क्रमप्राप्त होते. शेकडो ठेवीदारांनी बँकेत फेर्‍या मारल्या. मात्र, बँकेला त्यांची किंचितही दया आली नाही. उलटपक्षी उडवाउडवीची उत्तरे देऊन ठेवीदारांची वारंवार फसवणूक केली जात आहे. बँकेत घोटाळा झाल्यामुळेच त्यांना ठेवीदारांना त्यांचे पैसे देता आले नाहीत. ठेवीदारांनी जेव्हा आमच्याकडे संपर्क केला तेव्हा आम्ही त्यांना न्याय देण्याची ग्वाही दिली. त्या अनुषंगाने या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला असल्याचेही सोमय्या म्हणाले.

हेही वाचा - राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मुख्यमंत्र्यांनी बांधले शिवबंधन

ऑगस्ट 2019 पासून कर्नाळा बँक पदाधिकारी, विवेक पाटील (माजी आमदार) हे ठेवीदारांना फक्त आश्वासन देत आले आहेत. कोणत्याही ठेवीदारास त्यांनी पैसे परत दिलेले नाहीत. चौकशी अहवालावरून बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील आणि बँकेच्या संचालक मंडळाने 512 कोटी 55 लाख रुपयांचा अपहार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या सहकार खात्याने आणि संबंधित प्राधिकरणाने म. स. सं. अधिनियम 1960 आणि त्याखालील नियम 1961 मधील तरतुदीनुसार बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांची मालमत्ता जप्त करावी, ठेवीदारांचे पैसे परत करावे अशी मागणीही सोमय्या यांनी यावेळी केली. मी या घोटाळा प्रकरणासंदर्भात सहकारमंत्र्यांशी स्वतः बोललो आहे. विवेक पाटील पळून जाण्याची मला भीती वाटते. त्यामुळे त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, असेही ते म्हणाले. यावेळी उरणचे आमदार महेश बालदी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थितीत होते.

Intro:
कर्नाळा बँकेत किमान एक हजार कोटींचा घोटाळा-किरीट सोमय्या

नवी मुंबई :
शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्नाळा नागरी सहकारी बँकेत संचालक मंडळाने केलेल्या बेकायदेशीर व अनागोंदी कारभारामुळे 513 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, हा घोटाळा किमान एक हजार कोटी रुपयांचा असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विवेक पाटील यांनी परदेशात पळ काढण्यापूर्वी त्यांचा पासपोर्ट जप्त करावा, तसेच त्यांची अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी व्हावी, अशी मागणी करीत या घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोठ्या प्रमाणात असलेल्या या घोटाळ्यामुळे एक लाख लोकांवर याचा परिणाम होणार असल्याची चिंताही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

पत्रकारांना माहिती देताना किरीट सोमय्या यांनी पुढे सांगितले की, कर्नाळा बँकेत शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बोगस कर्ज खाती तयार करून माजी आमदार विवेक पाटील व त्यांच्या संचालक मंडळाने 513 कोटी रुपये इतका प्रचंड अपहार केला. म्हणून या बँकेचा दिवाळे निघाले. आणखीही अशी खाते असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा आकडा हजार कोटी रुपयांच्या घरात असेल.
ठेवीदार व खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाही, मात्र बँकेकडून फक्त आश्वासने, दमदाटी केली जात असल्याने ठेवीदार चिंतेत आहेत. अनेक ठेवीदारांचा या धसक्याने मृत्यूही झालेला आहे. अशा वेळी बँकेने त्यांना योग्य मार्गदर्शन करून वेळेवर त्यांचे पैसे देणे क्रमप्राप्त होते. शेकडो ठेवीदारांनी बँकेत फेर्‍या मारल्या, पण बँकेला त्यांची किंचितही दया आली नाही. उलटपक्षी उडवाउडवीची उत्तरे देऊन ठेवीदारांची वारंवार फसवणूक केली जात आहे. बँकेत घोटाळा झाल्यामुळेच त्यांना ठेवीदारांना त्यांचे पैसे देता आले नाहीत असे सांगून सोमय्या म्हणाले की, ठेवीदारांनी जेव्हा आमच्याकडे संपर्क केला तेव्हा आम्ही त्यांना न्याय देण्याची ग्वाही दिली. त्या अनुषंगाने या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला.
ऑगस्ट 2019पासून कर्नाळा बँक पदाधिकारी, विवेक पाटील (माजी आमदार) हे ठेवीदारांना फक्त आश्वासन देत आले आहेत. कोणत्याही ठेवीदारास त्यांनी पैसे परत दिलेले नाहीत. चौकशी अहवालावरून बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील व बँकेच्या संचालक मंडळाने 512 कोटी 55 लाख रुपयांचा अपहार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या सहकार खात्याने व संबंधित प्राधिकरणाने म.स.सं. अधिनियम 1960 व त्याखालील नियम 1961मधील तरतुदीनुसार बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ व अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत करावे. इतक्या मोठ्या प्रमाणात रकमेचा अपहार करून ते पैसे कुठे गुंतवले अथवा वापरले याची माहिती विवेक पाटील हेच देऊ शकतात. मी या घोटाळा प्रकरणासंदर्भात सहकारमंत्र्यांशी स्वतः बोललो आहे. ताबडतोब कारवाई व्हावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. विवेक पाटील पळून जाण्याची मला भीती वाटते. त्यामुळे त्यांचा पासपोर्ट जप्त करावा, तसेच त्यांच्या व परिवाराच्या सर्व संस्था अथवा कंपन्यांची ईडीमार्फत चौकशी करावी व त्यांच्यावर एमपीआयडी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्या यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत केली.
यावेळी उरणचे आमदार महेश बालदी, व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थितीत होते.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.