नवी मुंबई - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कंगना रणौतच्या वादग्रस्त विधानांचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेल्या भाषाशैलीचा निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले. कंगना राणौवतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेल्या भाषेचा ठिकठिकाणी विरोध नोंदवण्यात आला होता. यानंतरही तिने काही वादग्रस्त वक्तव्यं केली. त्याचा देखील प्रत्येकाने आपापल्या परीने समाचार घेतला होता. तर काहींनी त्याचं समर्थनही केलं.
ठाकरे माझेही मुख्यमंत्री
एमआयएम पक्षाचा जरी खासदार असलो, तरी मी महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे उद्धव ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल कंगना राणौतने केलेलं विधान अंत्यत चुकीचं असून, त्याचा निषेध करतो, असे जलील म्हणाले.
दोन्ही सरकार एकाच माळेचे मणी
राज्याताल मदरसे बंद करा, असे भाजपाचे अतुल भातखळकर यांनी वक्तव्य केले होते. त्याचा समाचार जलील यांनी घेतला. एका वर्षात अस काय घडलं की, आता मदरसे बंद करण्याचा अट्टाहास केला जातोय, असा उलटप्रश्न त्यांनी केला. दोन्ही सरकार एकाच माळेचे मणी असल्याची टीकाही इम्तियाज जलील यांनी केली.