ETV Bharat / state

नशीब बलवत्तर म्हणून 'त्या' माय-लेकाचा वाचला जीव; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद - डोंबिवली लोहमार्ग पोलीस

मंगला सोनावणे या आपल्या दोन मुलांना घेऊन डोंबिवली रेल्वे स्थानकात आल्या होत्या. त्यांनी पुढील प्रवासासाठी मुलांसह मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ते दोघेही फलाटावर लोकल लगत पडले.मात्र, लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेने लोकल रेल्वे खाली जाणाऱ्या माय-लेकांचा वेळीच जीव वाचला.

माय-लेकाचा वाचला जीव
माय-लेकाचा वाचला जीव
author img

By

Published : Feb 16, 2020, 9:52 PM IST

ठाणे - लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेने लोकल रेल्वे खाली जाणाऱ्या माय-लेकाचा जीव वाचला. डोंबिवली रेल्वे स्थानकातील तीन नंबरच्या फलाटावर ही घटना घडली. या घटनेचा थरार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाला. मंगला गणेश सोनावणे (वय, ३२) आणि कार्तिक (वय ६) असे दुर्घटनेतून वाचलेल्या माय-लेकाची नावे आहेत.

नशीब बलवत्तर म्हणून 'त्या' माय-लेकाचा वाचला जीव

मंगला सोनावणे या आपल्या दोन मुलांना घेऊन डोंबिवली रेल्वे स्थानकात आल्या होत्या. त्यांनी पुढील प्रवासासाठी मुलांसह मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मोठा मुलगा लोकलच्या डब्यात चडला मात्र, गर्दीच्या रेट्यामुळे कार्तिक आणि ते दोघेही फलाटावर लोकल लगत पडले. हा प्रकार तेथे असलेल्या डोंबिवली लोहमार्ग पोलीस कर्मचारी अनूप अब्राहम, बी. डी. लकडा आणि महिला कर्मचारी मनीषा गायकवाड यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ इतर प्रवाशांच्या मदतीने त्या दोघांना लोकल खाली जाण्यापूर्वी वाचवले.

हेही वाचा - थोडक्यात जीव बचावला; लोकल पकडण्यासाठी तरुणाचा धोकादायक प्रवास

दरम्यान, मंगला यांचा मोठा मुलगा राज हा मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये असल्याची माहिती कोपर स्थानकात कळवण्यात आली. तेथे कार्यरत असलेले लोहमार्ग पोलीस कर्मचारी पांडुरंग मोरे यांनी त्याला कोपर स्थानकात उतरून घेतले. त्यानंतर त्याला पुन्हा डोंबिवली स्थानकात आपल्या आईच्या ताब्यात दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.