ETV Bharat / state

वागळे आगाराबाहेर टीएमटी चालकाला मारहाण - bus stand

वृंदावन सोसायटी-वागळे आगार या मार्गावर धावणाऱ्या टीएमटी बसची धडक आगाराबाहेरील रिक्षाला लागली. या रिक्षाचा धक्का लागून स्थानिक व्यक्ती खाली पडल्याने संतप्त जमावाने टीएमटी बसचा चालक राहुल धनगर (25) यांना केबिनकडील काच फोडून बाहेर काढले आणि मारहाण केली.

वागळे आगाराबाहेर टीएमटी चालकाला मारहाण
author img

By

Published : Jun 13, 2019, 10:07 AM IST

ठाणे - वागळे आगाराकडे येणाऱ्या टीएमटी बसचा स्थानिक रहिवाश्याला धक्का लागल्याने संतप्त जमावाने टीएमटी चालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. जमावाने बसची काच फोडून चालकाला दगड व रॉडने मारहाण केली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकाला मारहाण करणाऱ्या आरोपी सूरज उर्फ बबलू गुप्ताला (वय.30) अटक केली आहे.

वृंदावन सोसायटी-वागळे आगार या मार्गावर धावणाऱ्या टीएमटी बसची धडक आगाराबाहेरील रिक्षाला लागली. या रिक्षाचा धक्का लागून स्थानिक व्यक्ती खाली पडल्याने संतप्त जमावाने टीएमटी बसचा चालक राहुल धनगर (25) यांना केबिनकडील काच फोडून बाहेर काढले आणि मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला व डोक्याला दुखापत झाली. त्यांना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टीएमटी कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी टीएमटी एम्प्लॉईज युनियनने केली आहे.

Intro:वागळे आगाराबाहेर टीएमटी चालकाला मारहाण
Body:

वागळे आगाराकडे येणाऱ्या टीएमटी बसचा स्थानिक रहिवाश्याला धक्का लागल्याने संतप्त जमावाने टीएमटी चालकाला मारहाण केल्याचा प्रकार आज घडला.तसेच,जमावाने बसची काच फोडून चालकाला दगड व रॉडने मारहाण केली.याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून टीएमटी कर्मचाऱ्याने चालकाला मारहाण करणाऱ्या आरोपी सूरज उर्फ बबलू गुप्ता (30) याला अटक केली.
वृंदावन सोसायटी येथून वागळे आगार या मार्गावर धावणाऱ्या टीएमटी बसची धडक आगाराबाहेरील रिक्षाला लागली.या रिक्षाचा धक्का लागून स्थानिक व्यक्ती खाली पडल्याने संतप्त जमावाने टीएमटी बसचा चालक राहुल धनगर (25) यांना कॅबिनकडील काच फोडून धनगर यांना बाहेर काढून मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला व डोक्याला दुखापत झाली.त्यांना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून टीएमटी कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी टीएमटी एम्प्लॉईज युनियनने केली आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.