ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. याच निवडणुकीत सत्ताधाऱ्यासह प्रस्तापित असलेल्या राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यासाठी मनसे तयार असून ठाणे महापालिका निवडणुकीत ठाण्यात 'ठाणे विकास आघाडी ' मैदानात उतरणार आहे. त्यामुळे ज्याना तिकट मिळणार नाही, जे इच्छुक उमेदवार आहेत अश्या सर्वांना एकत्र घेऊन ठाणे विकास आघाडी स्थापन करण्यात येणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परवानगीने ठाण्यात विकास आघाडी स्थापन करण्यात येणार आहे. समाजात काम करत असणाऱ्या महत्वाच्या घटक, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे. आगामी पालिका निवडणुकीत ठाणे विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीचे मैदान गाजवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन मनसेचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे.
Thane Municipal Election: मनसेची 'ठाणे विकास आघाडी' छोटे पक्ष, इच्छुकांना एकत्र येण्याचे आवाहन - Maharashtra Navnirman Sena
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे (Thane Municipal Election) पडघम वाजु लागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (Maharashtra Navnirman Sena) कंबर कसली आहे. प्रस्थापित राजकिय पक्षांना धडा शिकवण्यासाठी छोटे-मोठे पक्ष, इच्छुक तसेच समाजसेवी प्रभुतीना सोबत घेऊन 'ठाणे विकास आघाड़ी' रिंगणात उतरवणार असल्याचे मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्पष्ट करताना सर्वांनी एकत्रित (appeals to come together) येण्याचे आवाहन केले आहे.
![Thane Municipal Election: मनसेची 'ठाणे विकास आघाडी' छोटे पक्ष, इच्छुकांना एकत्र येण्याचे आवाहन MNS Thane Development Front](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14367141-486-14367141-1643947951165.jpg?imwidth=3840)