ठाणे - लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर झालेला नसताना देखील वीज महामंडळाकडून सरासरी बिले पाठवली जात आहे. ही बिले तात्काळ थांबवा अन्यथा मनसेच्या खळ्ळ खट्याकचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, असा धमकीवजा इशारा मनसेचे उपशहराध्यक्ष विश्वजित जाधव यांनी वीज महामंडळाला दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, कार्यालये व कंपन्या पूर्णतः बंद आहेत. यामुळे लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात वीज महामंडळाकडून ग्राहकांना वीजबिले पाठवण्यात येत आहेत. ही बिले विजेचा वापर नसताना देखील सरासरी पद्धतीने पाठवण्यात येत आहेत. त्यांच्या या निर्णयावर मनसेने आपेक्ष घेतला आहे.
मनसेचे उपशहराध्यक्ष विश्वजीत जाधव यांनी वीज महामंडळाला बिले थांबवा, अन्यथा मनसेचे सर्व नेते व कार्यकर्ते व्यापाऱ्यांसह रस्त्यावर उतरतील आणि त्यानंतर मनसेचे खळ्ळ खट्याकला तुम्हाला समोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा - कौतुकास्पद, चिमुकल्यांनी तीस दिवस उपवास करत केला रोजा पूर्ण
हेही वाचा - अखेर ठाण्यात रेपिड एक्शन फोर्स दाखल, नागरिकांना शिस्त लावण्याचे प्रयत्न