ETV Bharat / state

छट पुजेला विरोध नाही पण स्वछतेला महत्व - मनसे

छट पुजेला विरोध नाही पण स्वछतेला महत्व द्यावे, अशी आमची भूमिका असल्याचे मनसेने सांगितले आहे. छटपूजा साजरी करताना कोणताही वाद उद्भवू नये याकरता वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस प्रशासन, आदींसह छटपूजा आयोजक व मनसेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.

छट पुजेला विरोध नाही पण स्वछतेला महत्व - मनसेची मागणी
author img

By

Published : Oct 30, 2019, 6:28 PM IST

ठाणे - गणेशोत्सवाप्रमाणे छटपूजादेखील कृत्रिम तलावातच करावी. किंबहुना निर्माल्यदेखील कृत्रिम तलावातच विसर्जित करावे अशी मागणी मनसेने केली आहे. छट पुजेला विरोध नाही पण स्वछतेला महत्व द्यावे, अशी आमची भूमिका असल्याचे मनसेने सांगितले आहे. यासाठी मनसेने ठाणे महापालिकेला साकडे घातले आहे.

वर्तकनगर पोलीस ठाण्यात नुकतीच छटपूजा आयोजक आणि मनसे पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आयोजकांना तसे बजावण्यात आले असल्याचे सांगितले.

हेही वाचा - परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी - नाना पटोले

ठाणे तलावांचे शहर अशी ख्याती आहे. तेव्हा, तलावांची निर्मळता जपणे हे प्रत्येक ठाणेकरांचे कर्तव्य आहे. जसे गणोशोत्सव अथवा नवरात्रौत्सवात मुर्तीचे आणि निर्माल्याचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचा परिपाठ ठाणे महापालिकेतर्फे राबवण्यात आला. त्याला नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता. या पार्श्वभूमीवर छटपूजादेखील कृत्रिम तलावात साजरी करावी अशी आग्रही मागणी मनसेने केली होती. त्यानुसार,मागील वर्षी उपवन येथील तलावात छटपुजा साजरी न करता गणपती उत्सवाप्रमाणे कृत्रिम तलावात करण्यात आली होती. मनसेच्या या मागणीला ठाणे महापालिका व आयोजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

दरम्यान, यावर्षीदेखील छटपूजा साजरी करताना कोणताही वाद उद्भवू नये याकरता वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस प्रशासन, आदींसह छटपूजा आयोजक व मनसेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला मनसेचे ठाणे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाने आयोजकांना कोणतेही जलप्रदूषण होणार नाही. याची काळजी घेण्याबाबत सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - 'आठवड्यातील वार सत्तेसाठी वाटून घ्या आणि उरलेला रविवार आठवलेंना द्या', आव्हाडांची टीका

Intro:छट पुजेला विरोध नाही पण स्वछतेला महत्व मनसेची मागणी पोलिसांनी केली मध्यस्तिBody:गणेशोत्सवाप्रमाणे छटपूजादेखील कृत्रिम तलावातच करावी. किंबहुना निर्माल्यदेखील कृत्रिम तलावातच विसर्जित करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केली आहे. यासाठी मनसेने ठाणे महापालिकेला साकडे घातले असून वर्तकनगर पोलीस ठाण्यात नुकतीच छटपूजा आयोजक आणि मनसे पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आयोजकांना तसे बजावण्यात आले असल्याचे सांगितले.  
ठाणे तलावांचे शहर अशी ख्याती आहे. तेव्हा,तलावांची निर्मळता जपणे हे प्रत्येक ठाणेकरांचे कर्तव्य आहे. जसे गणोशोत्सव अथवा नवरात्रौत्सवात मुर्त्यांचे आणि निर्माल्याचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचा परिपाठ ठाणे महापालिकेतर्फे राबवण्यात आला त्याला नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता. या पार्श्वभूमीवर छटपूजादेखील कृत्रिम तलावात साजरी करावी अशी आग्रही मागणी मनसेने केली होती.  त्यानुसार,मागील वर्षी उपवन येथील तलावात छटपुजा साजरी न करता गणपती उत्सवाप्रमाणे कृत्रिम तलावात करण्यात आली होती.मनसेच्या या मागणीला ठाणे महापालिका व आयोजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.दरम्यान,यावर्षीदेखील छटपुजा साजरी करताना कोणताही वाद उदभवू नये याकरिता वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस प्रशासन , आदींसह छटपूजा  आयोजक व मनसेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीला मनसेचे ठाणे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पोलीस प्रशासनाने आयोजकांना कोणतेही जलप्रदूषण होणार नाही.याची काळजी घेण्याबाबत सांगण्यात आले आहे.

BYTE : संदीप पाचंगे (मनसे-  विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष -ठाणे)BYTE : धनंजय सिंग ( छटपूजा आयोजक -ठाणे )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.