ETV Bharat / state

'बिल्डर'च्या सांगण्यावरून राकेश पाटलांची निर्घृण हत्या केल्याचा मनसे जिल्हाध्यक्षांचा आरोप - ठाणे राकेश पाटील हत्याकांड बातमी

अंबरनाथमधील बिल्डर पटेलच्या सांगण्यावरून मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या करण्यात आल्याचा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.

आरोपींसह पोलीस
आरोपींसह पोलीस
author img

By

Published : Oct 29, 2020, 6:53 PM IST

Updated : Oct 29, 2020, 7:45 PM IST

ठाणे - अंबरनाथमधील बिल्डर पटेलच्या सांगण्यावरून मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची धारदार हत्याराने भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. यामुळे पाटील यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी व्यवसायिक वर्चस्वाच्या वादातून 6 ते 7 जणांच्या टोळक्याने हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी, मनसेच्या जिल्हाध्यक्षांच्या आरोपामुळे याप्रकरणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे.

बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष
  • दोन तासातच पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

राकेश पाटील यांच्या हत्येप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात डी. मोहन, भरत पाटील, विनायक पिल्ले, अख्तर खान, विजय दासी, राजू दासी, रमेश दोहार व त्यांच्या इतर 2-3 साथीदारांवर गुन्हा दाखल करून या आरोपींचा शोध सुरू केला होता. दोन तासातच मारेकरी अंबरनाथहून मुरबाडच्या दिशेने एका गाडीतून पळून जात असताना पोलिसांनी नाकेबंदीद्वारे चार आरोपींना अटक करत शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

  • 'असा' झाला राकेश पाटील यांचा खून

अंबरनाथ शहरातील पालेगाव परिसरात अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहे. याच परिसरात जैनम सोसायटीचे काम सुरू असून त्या ठिकाणी काही कामानिमित्त काल (दि. 28 ऑक्टोबर) सायंकाळी राकेश पाटील गेले असता यांच्यावर 6 ते 8 जणांच्या टोळक्याने धारदार हत्यारांनी हल्ला केला. यावेळी पाटील यांनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले. जखमी अवस्थेत पाटील यांना तत्काळ कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

  • मनसे जिल्हाध्यक्षकांनी केले 'हे' आरोप

मृत राकेश पाटील यांनी अंबरनाथ येथील पालेगाव परिसरात सुरू असलेल्या नव्या गृह संकुलात पावसाचे पाणी साचते तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे कोणीही या परिसरात घरे खरेदी करू नका, असे गेली वर्षांपसून जनजागृती करत होते. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांच्या घरे विक्रीवर परिणाम झाला. त्यातच यंदाच्या दसऱ्याच्या मुहर्तावर नागरिकांनी या परिसरात घरे खरेदी केलीच नाही. त्यामुळेच राकेश पाटील यांची पटेल बिल्डरच्या सांगण्यावरून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव त्यांनी केला आहे.

  • आरोपींना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, अटकेत असलेल्या चार हल्लेखोरांना आज (दि. 29 ऑक्टोबर) न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने हल्लेखोरांना 7 नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - अंबरनाथ मनसे शहर उपाध्यक्षाची भर रस्त्यात हत्या... चार संशयित हल्लेखोर ताब्यात

Last Updated : Oct 29, 2020, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.