ETV Bharat / state

ठाणे पालिका: आयुक्तांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावर मनसेचे ताशेरे

आयुक्त बंगल्यात तब्बल ४९ लाख ८३ हजाराचे वॉटर प्रुफिंग, प्लंबिंग केले जाणार आहे. मात्र, याआधीचे आयुक्त जयस्वाल यांच्या काळातही बंगल्यावर लाखोंची उधळण केली जात होती, ती नेमकी कुठे मुरली, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. आयुक्तांनीच या खर्चाला कात्री लावून आवश्यक कामे करून घेण्याची मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी केली आहे.

mns leader sandeep pachange
मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे
author img

By

Published : May 11, 2020, 1:19 PM IST

ठाणे- कोरोनाचा प्रकोप सुरू असताना आरोग्यविषयक मुलभूत सोयीसुविधांसाठी ठाणे महानगरपालिका संघर्ष करत आहे. मात्र, दुसरीकडे आयुक्त बंगल्याच्या दुरुस्तीसाठी ५० लाखांच्या निविदा काढून ठाणेकरांच्या खिशावर कात्री मारण्याचा घाट घातला जात आहे. आधीच्या आयुक्तांच्या कार्यकाळात उत्तम पद्धतीने डागडुजी केलेल्या या बंगल्यावर पुन्हा एकदा 'सोन्याची कौले' चढवण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकार कोरोनाकाळात ठाणेकरांच्या भावनांशी खेळणारा आहे, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणी 'आधीच कोरोना, त्यात आयुक्त बंगल्यावर खर्च मत 'करोना' असे बजावले आहे.

माहिती देताना मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे

ठाण्याचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पदभार सोडल्यानंतर कोरोनाचा प्रार्दुभाव सुरू असतानाच नवे आयुक्त विजय सिंघल यांनी आयुक्तपदाची धुरा हाती घेतली. काही दिवसात त्यांनी कामाची छाप पाडण्यास सुरवात केली. मात्र, असे असतानाच नव्या आयुक्तांसमोर स्वत:ची कॉलर ताठ करून घेण्यासाठी पालिकेतील भ्रष्ट प्रशासकीय साखळीने पातलीपाडा येथील आयुक्त बंगल्याच्या नुतनीकरणाचा विडा उचलला आहे. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आयुक्त बंगल्याच्या नुतनीकरण व दुरुस्तीचे वेध लागलेले आहेत.

कोरोना संकटात पालिकेची रुग्णालये आणि विलगीकरण कक्षांची दुरावस्था आहे. ठाणे पालिका लोकप्रतिनिधी स्वत:चे एक महिन्याचे वेतन व नगरसेवक निधी या आपत्ती निवारणासाठी देत आहेत. पालिका कर्मचार्‍यांच्या वेतनात कपात केली जात आहे. अशा कसोटीच्या काळात प्रशासनातील सर्वोच्च पदावरील अधिकार्‍यांच्या बंगल्यावर वारेमाप खर्च करणे निश्चितच सद्यपरिस्थितीत योग्य नसल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी व्यक्त केले.

निविदा प्रक्रियेत देखील गडबड

सर्वसाधारणपणे निविदा भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जातो. अत्यावश्यक कामादरम्यान हा कालावधी ७ दिवसांचा असतो. त्याच धर्तीवर या कामासाठी अवघ्या ७ दिवसात निविदा मागवल्या असून आयुक्त बंगल्याची डागडुजी करण्यापूर्वी त्याचे स्ट्रक्चर ऑडिट झाले आहे का?, कोरोना उपचारांसाठी आवश्यक असलेल्या साहित्य खरेदीला काटेकोर नियम लावले जातात, मग बंगल्याच्या दुरुस्तीला सवलत का?, असे प्रश्नही संदीप पाचंगे यांनी उपस्थित केले आहेत.

आयुक्त बंगल्यात तब्बल ४९ लाख ८३ हजाराचे वॉटर प्रुफिंग, प्लंबिंग केले जाणार आहे. मात्र, याआधीचे आयुक्त जयस्वाल यांच्या काळातही बंगल्यावर लाखोंची उधळण केली जात होती, ती नेमकी कुठे मुरली, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. आयुक्तांनीच या खर्चाला कात्री लावून आवश्यक कामे करून घेण्याची मागणी संदीप पाचंगे यांनी केली आहे.

हेही वाचा- खाकीतील माणुसकीचे दर्शन; परराज्यात पायी जाणाऱ्यांना फुकट बस प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.