ETV Bharat / state

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी मनसे कार्यकर्त्याकडून मदत

author img

By

Published : Jan 30, 2021, 7:47 AM IST

राम मंदिर उभारणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत जास्तीत जास्त देणगी कशी उभारली जाईल यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. तसेच जास्तीत जास्त हिंदू बांधव आणि राम भक्तांनी राम मंदिर उभारणीसाठी देणगी देण्याचे आवाहनही महेश कदम यांनी केले आहे.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी मनसे कार्यकर्ते सरसावले

ठाणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी मनसेकडून नियोजन देखील सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मनसेचे ठाणे कोप्री पाचपाखडी विभागाध्यक्ष महेश कदम यांनी भव्य राम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रीय स्वयम् संघाकडे निधी दिला.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी मनसे कार्यकर्त्याकडून मदत

जास्तीत जास्त निधी गोळा करण्यासाठी मनसेचा पुढाकार

राम मंदिर उभारणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत जास्तीत जास्त देणगी कशी उभारली जाईल यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. तसेच जास्तीत जास्त हिंदू बांधव आणि राम भक्तांनी राम मंदिर उभारणीसाठी देणगी देण्याचे आवाहनही महेश कदम यांनी केले आहे.

भाजप आणि मनसेची जवळीक?

एकीकडे मनसेचा मराठीचा मुद्दा काही प्रमाणात मागे पडल्याचे चित्र दिसत आहे तर दुसरीकडे हिंदुत्वाची कास धरीत मनसे राजकीय पटलावर मार्गक्रमण करीत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुरुवातीपासून राम मंदिर हा मुद्दा कळीचा ठरलेला आहे अशा वेळेस राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही निश्चितच बदल घडवेल असा विश्वास मनसे कार्यकर्त्यांना आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.