ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदार योग्य निर्णय घेऊन मतदान करतील आणि योग्य व्यक्तीला निवडून देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
'या ५ वर्षात ठाणेकरांना आमदार दिसले नाहीत. त्यांनी काही कामं केलेली नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये एक राग आहे. रोष आहे. तो चेहऱ्यावर दिसतोय. त्यामुळे बदल नक्की होईल. आज पडणारा पाऊस हा राज्यातील घाण आणि महाराष्ट्राला लागलेली धुळ वाहुन जाण्यासाठी पडत असल्याचंही वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
हेही वाचा - ठाणे जिल्ह्यात मतदानासाठी पोलीस प्रशासन सज्ज; १३ हजार पोलीस कर्मचारी तैनात
ठाणेकरांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन अविनाश जाधव यांनी केलं आहे.
हेही वाचा -ठाणे जिल्ह्यातील मतदानावर पावसाचे सावट; मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?