ठाणे: विशेष म्हणजे, गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीला उधाण आले होते. यामुळेच दोन्ही शहरात मनसेचा एकही नगरसेवक नसल्याने राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मनसेत खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे पक्षबांधणीसाठी मैदानात: राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटन बांधणीसाठी ठाणे जिल्ह्यातील मनसैनिकांचे मेळावे घेऊन त्यांचे मत जाऊन घेत आहेत. आज (रविवारी) ठाणे जिल्ह्यातील दौऱ्याचा तिसऱ्या दिवशी त्यांनी उल्हासनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते अंबरनाथ, उल्हासनर आणि बदलापूर शहरांच्या दौऱ्यावर आले होते. गेल्या काही महिन्यांपासून मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक वाद-विवाद होत आहेत. याबाबत राज ठाकरे यांनी बदलापूर आणि उल्हासनगर शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले. यानंतर पक्षात असलेल्या अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजीमुळे ही कार्यकारिणी बरखास्त करत असल्याचे ठाकरेंनी सांगितले. लवकरच १० दिवसात नवे पदाधिकारी नेमणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
भाजप आमदाराने केले ठाकरेंचे स्वागत: याप्रसंगी मनसेचे उल्हासनगर शहर प्रमुख बंडू देशमुख यांनी गटबाजीवर खुलासा केला. ते म्हणाले की, प्रत्येक पक्षात गटबाजी आहे. घरांमध्येही मतभेद असतात. शिवाय आगामी काळात विविध निवडणुका आहेत. त्या निवडणुकीत मनसेचे आमदार, नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. राज ठाकरे उल्हासनगरमध्ये आले असता त्यांचे स्वागत उल्हासनगर भाजपचे आमदार कुमार अयलानी यांनी केले. भाजप आमदारांनी यावेळी राज ठाकरेंना सिंधी समाजाचे गुरु साई झुलेलाल यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह शेकडोच्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा: