ETV Bharat / state

ठाणे महानगरपालिका हद्दीत कोरोना संदर्भातील स्वॅब चाचणी मोफत करा, मनसेचे मागणी - pradip sawardekar

कोरोनाची चाचणी करण्याकरिता महापालिकेकडून 4 हजार 500 रुपये इतके शुल्क आकारण्यात येत असून सद्यस्थीतीत नागरिकांना ही बाब परवडणारी नाही. त्यामुळे, शासनाच्या धोरणानुसार ही चाचणी महापालिकेने मोफत करावी अशी मागणी मनसेचे ठाणे शहर सचिव प्रदीप सावर्डेकर यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना ई-मेलद्वारे केली आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीत थ्रोट स्वॅब चाचणी सरसकट फुकट करण्याची मनसेचे मागणी

author img

By

Published : Apr 16, 2020, 3:04 PM IST

Updated : Apr 16, 2020, 3:11 PM IST

ठाणे - संपूर्ण देशात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. ठाणे शहरातही याचे काही रुग्ण आढळले असून काही नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे, कोरोनाच्या चाचणीकरता नागरिक स्वत:हुन पुढे येत आहे. मात्र, या चाचणीकरता पालिकेकडून ४ हजार ५०० रुपये शुल्क घेतले जात आहे. इतके शुल्क सध्याच्या संकटकाळात नागरिक देऊ नाहीत त्यामुळे, ही चाचणी महापालिकेने मोफत करण्याची मागणी केली जात आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीत थ्रोट स्वॅब चाचणी सरसकट फुकट करण्याची मनसेचे मागणी

कोरोनाची ओळख पटण्यासाठी घशातील स्त्रावाची (थ्रोट स्वॅब) चाचणी केल्यानंतर या आजाराचे निदान केले जात आहे. बहुतेक नागरिकांना कोरोना विषाणूची लक्षणं दिसून येत नाहीत, त्यांना (सायलेंट कॅरियर्स) असे म्हणतात. मात्र, त्यांची चाचणी केल्यानंतर रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका चॅनेलच्या पत्रकाराला कोरोनाची लागण झाली. त्यांच्यातसुद्धा कोरोनाची लक्षणे दिसून आली नव्हती. मात्र, तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यात ही चाचणी करण्याकरिता महापालिकेकडून 4 हजार 500 रुपये इतके शुल्क आकारण्यात येत असून सद्यस्थीतीत नागरिकांना ही बाब परवडणारी नाही. त्यामुळे, शासनाच्या धोरणानुसार ही चाचणी महापालिकेने मोफत करावी, अशी मागणी मनसेचे ठाणे शहर सचिव प्रदीप सावर्डेकर यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना ई-मेलद्वारे केली आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सर्वसाधारण रुग्ण हा सर्दी, खोकला या आजारांनी त्रस्त असून यावर उपचार घेवूनसुध्दा आजार बरा होत नसल्याने त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे, मनातील शंका दूर करण्यासाठी काही नागरिक स्वत:हून कोरोनाच्या तपासणीसाठी पुढे येत आहेत. मात्र, थ्रोट स्वॅब चाचणी करण्याकरिता ते महापालिकेच्या आरोग्यकेंद्रात गेले असता, या चाचणीसाठी 4 हजार 500 इतके शुल्क भरावे लागेल, असे त्यांना सांगण्यात येत आहे. सद्यस्थीतीत सर्व नागरिक घरी असताना त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे थ्रोट स्वॅब चाचणीसाठी आकारण्यात येणारे 4 हजार 500 एवढे शुल्क भरणे या नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे, या चाचणीचा खर्च महापालिकेने करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना थ्रोट स्वॅब चाचणी महापालिकेतर्फे मोफत करण्यात यावी अशी मागणी मनसेचे ठाणे शहर सचिव प्रदीप सावर्डेकर यांनी केली आहे.

Last Updated : Apr 16, 2020, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.