ETV Bharat / state

शेवटचे दोन दिवस..अन्यथा संघर्ष अटळ; 'वीज बिलां'वरून ठाण्यात मनसेची जोरदार बॅनरबाजी - मनसे वाढीव वीजबील आंदोलन

सरकारने वीजबील दरवाढ मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर मनसेने आपला विरोध दर्शवत राज्य सरकारला सोमवारपर्यंतचा 'अल्टिमेटम' दिला होता. आता राज्य सरकारने काहीच निर्णय जाहीर न केल्याने मनसेने ठाण्यात सर्वत्र बॅनरबाजी केली आहे.

ठाण्यात मनसेची जोरदार बॅनरबाजी
ठाण्यात मनसेची जोरदार बॅनरबाजी
author img

By

Published : Nov 22, 2020, 7:18 PM IST

ठाणे - राज्यातील जनतेला वाढीव वीजबील देण्यात आल्यानंतर सरकारने वीजबील दरवाढ मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर मनसेने आपला विरोध दर्शवत राज्य सरकारला सोमवारपर्यंतचा 'अल्टिमेटम' दिला होता. आता राज्य सरकारने काहीच निर्णय जाहीर न केल्याने मनसेने ठाण्यात सर्वत्र बॅनरबाजी केली आहे. मुंबईप्रमाणेच ठाण्यात देखील सोमवारपर्यंतच्या मुदतीची आठवण सरकारला करून देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. ठाण्यात वागळे इस्टेट, नौपाडा, हरिनिवास चौक, स्थानक परिसरात, तसेच शासकीय मुख्य कार्यालयाच्या बाहेर मनसेकडून मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर वीजबील दरवाढ मागे घेतली नाही तर संघर्ष अटळ आहे, असे सांगण्यात आले आहे. 26 नोव्हेंबर रोजी मनसेतर्फे संपूर्ण राज्यात आंदोलन केले जाणार आहे. त्याआधी सरकारला मनसेकडून इशारा देण्यात आला आहे.

'वीज बिलां'वरून ठाण्यात मनसेची जोरदार बॅनरबाजी
कोरोना काळात नागरिकांना वाढीव वीजबील आकारण्यात आली असताना ही बिले कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नसल्याचे सांगितल्यानंतर अनेक सामान्य नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होणार असून संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे.
कोरोना काळ सर्वांसाठी वाईट
लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून काही उद्योगधंदे बंद झाले आहेत. सामान्य नागरिकांच्या हाताला काम नाही आणि त्यातच राज्य सरकार गोर-गरीब जनतेची चेष्टा करत असून वीजबिले वाढवून नाहक त्रास नागरिकांना देत असल्याचा आरोप मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला आहे. ठाण्यात मनसेने केलेल्या फलकबाजीमुळे या आंदोलनाची चर्चा सर्वत्र असून कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.