ETV Bharat / state

ठाण्यात मनसे-राष्ट्रवादीमध्ये रंगली होळी; लोकसभा निवडणुकीत एकच रंग असल्याचे संकेत - मनसे आणि राष्ट्रवादी

ठाण्यात रंगपंचमीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकाच रंगात भिजताना दिसले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना रंगपंचीमीच्या शुभेच्छा दिल्या.

मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होळी खेळताना
author img

By

Published : Mar 21, 2019, 5:42 PM IST

Updated : Mar 21, 2019, 7:57 PM IST

ठाणे - शहरात मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून लोकसभा निवडणुकीत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले आहेत. ठाणे लोकसभा मतदार संघामधून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी एकमेकांना रंग लावून येत्या २३ मे रोजी एकत्रच गुलाल उधळू, असे जाहीर केले आहे. अविनाश जाधव आणि आनंद परांजपे यांच्या या भूमिकेमुळे ठाण्यात मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होळी खेळताना

रंगपंचमीच्या निमित्ताने ठाण्यात पक्ष आणि राजकीय मतभेद विसरून एकमेकांना रंग लावण्याची परंपरा तशी जुनीच आहे. मात्र, यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्याने यावेळी या सणाला राजकीय रंग चढला होता. राज ठाकरे यांनी या आधीच आपला पक्ष निवडणूक लढवणार नसल्याचे सांगून कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, ठाण्यात रंगपंचमीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकाच रंगात भिजताना दिसले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना रंगपंचीमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परांजपे आणि जाधव या एकमेकांना एकाच रंग लावून आपला एकच रंग असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.

ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विचारे आणि परांजपे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा मिळाल्यास शिवसेना पक्षाच्या अडचणी काही प्रमाणात वाढणार असल्याने ठाणे लोकसभेची निवडणूक शिवसेनेला काही प्रमाणात कठीण जाणार असल्याचे चिन्हे आहेत.

Intro:मनसे-राष्ट्रवादीचा एकच रंग लोकसभा निवडणुकीच्या आधी ठाण्यात पाहायला मिळाले रंगBody:

बुरा ना मानो होली है म्हणत ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून लोकसभा निवडणुकीत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले आहेत . ठाणे लोकसभा मतदार संघामधून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी एकमेकांना रंग लावून येत्या २३ मे रोजी एकत्रच गुलाल उधळू असे जाहीर केले आहे . अविनाश जाधव आणि आनंद परांजपे यांच्या या भूमिकेमुळे ठाण्यात मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले असून शिवसेनेला हि निवडणूक आता फारशी सोपी नसल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .

रंगमंचामीच्या निमित्ताने ठाण्यात पक्ष आणि राजकीय मतभेद विसरून एकमेकांना रंग लावण्याची परंपरा तशी जुनीच आहे . मात्र यंदाही वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने यावेळी या सणाला राजकीय रंग चढला होता . राज ठाकरे यांनी या आधीच आपला पक्ष निवडणूक लढवणार नसल्याचे सांगून अद्याप कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही . मात्र ठाण्यात रंगपंचमीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकाच रंगात भिजताना दिसले . राष्टवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना रंगपंचीमीच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी परांजपे आणि जाधव या एकमेकांना एकाच रंग लावून आपला एकच रंग असल्याचं जाहीर केले . विशेष म्हणजे मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.
ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आली आहे . तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे . त्यामुळे विचारे आणि परांजपे यांच्यामध्ये थेट लढत होणार असून जर मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा मिळाल्यास शिवसेना पक्षाच्या अडचणी काही प्रमाणात वाढणार असल्याने ठाणे लोकसभेची निवडणूक शिवसेनेला काही प्रमाणात कठीण जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे .
Byte आनंद परांजपे राष्ट्रवादी नेते अविनाश जाधव मनसे जिलध्यक्षConclusion:
Last Updated : Mar 21, 2019, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.