ठाणे - वाढीव वीज बिल, सक्तीची वीज बिल वसुली तसेच खोट्या वीज चोरीच्या पोलीस तक्रारी व टोरंट पॉवरच्या मनमानी कारभार याविरोधात मनसेने गुरुवारी (दि. 7 जााने.) दुपारी आक्रमक पावित्रा घेत भिवंडीत वीज वितरण करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीची कार्यालये हातात लाकडी दांडके आणि बॅटने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.
वीज बिल माफ न केल्याने घडला प्रकार
भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथील ओसवालवाडी त्याचबबरोबर वंजारपट्टी नाका चावींद्रा रोड येथील टोरंट पॉवरच्या कार्यालायांवर मनसैनिकांनी घोषणाबाजी करत मोर्चा वळविला. मनसेचे भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. याप्रकरणी टोरंट पॉवरचे अधिकारी तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - भाजपाला धक्के पे धक्का : सुपारीकांड नगरसेवकाचा जामीन नामंजूर
हेही वाचा - ठाण्यातील बगळ्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळे नाही - सुनिल केदार