ETV Bharat / state

MLA Abu Azmi Statement : छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्मासाठी नव्हे, तर सत्तेसाठी लढाई - आमदार अबू आझमी

छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्मासाठी नव्हे, तर सत्तेसाठी लढाई होती. मात्र सध्या सत्तेवर असलेले सरकार विकासाचं राजकारण नाही तर हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करून मुस्लिमांचा चुकीचा इतिहास समोर आणून हिंदूंची दिशाभूल करून सत्ता टिकवायची असल्याचा आरोप करत आमदार अबू आझमी यांनी भाजप - शिंदे गटावर निशाणा साधला, ते भिवंडीत एका कार्यक्रमासाठी आज आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सध्याच्या राजकीय घडामोडीवर टीका केली आहे.

MLA Abu Azmi Statement
अबू आझमी
author img

By

Published : Jan 22, 2023, 7:40 PM IST

Updated : Jan 22, 2023, 9:04 PM IST

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी माध्यमांसोबत प्रतिक्रिया व्यक्त करताना

ठाणे : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेबविषयी मोठे वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्मासाठी नव्हे, तर सत्तेसाठी लढाई होती. मात्र सध्या सत्तेवर असलेले सरकार विकासाचं राजकारण नाही तर हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करण्यासाठी चुकीचा इतिहास मांडत आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे. ते भिवंडीतील एका कार्यक्रमात बोलत होते.

धमक्यांना घाबरत नाही : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांना २१ जानेवारी रोजी फोनवरून अज्ञात व्यक्तीने औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत आजमी यांना पत्रकारांनी विचारले असता, काही कट्टर पंथीयांना मी करत असलेले सामाजिक काम आवडत नसल्याने धमकी देत असतात, मी या धमक्यांना घाबरत नाही.

राज्य सरकारवर टीकास्त्र : ते पुढे म्हणाले की, सुरूवातीपासून मी समाज कल्याणसाठी समाजोपयोगी काम करत आलो आहे. हिंदू मुस्लिम धर्म एकोप्याचे काम करत आहे. मी औरंगजेब बादशहाची वावा केली, म्हणून हे काही लोकांना आवडत नसल्याने अशा धमक्या मला येत असतात. त्यामुळे मी या धमक्यांना घाबरत नाही, मला यापूर्वी देखील अशा धमक्या आलेल्या आहेत. परंतु काही कारवाई झालेली नाही मी भिक मागणार नाही, महाराष्ट्र सरकारला जे काही करायचं असेल ते त्यांनी करावा तसेच हिंदू मुस्लिम यांच्यात भांडण लावून सत्तेत बनून राहणे अशी त्यांच्याकडून खेळी खेळली जाते आहे.

नाव बदलणे ही ध्रुवीकरणाची नीती : राज्यात औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर हे तीनच जिल्हे आहेत जे मुस्लीमांच्या नावाने आहेत. खूप जुन्या काळापासून हे नाव आहे हे बदलू नये ही आमची भूमिका आहे. त्यातून काही विकास होणार नाही. गरीबी दूर होणार नाही. नाव बदलण्यावरून मोठे नुकसान होईल. नाव बदलल्याने सगळे काही बदलावे लागेल. यात खूप खर्च होईल, असेही अबू आझमी यांनी म्हटले. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याची उंची खूप मोठी आहे. छोट्या जिल्ह्याचे नाव बदलणे ठीक नाही. जर नावे द्याची असेल तर नवीन शहर उभारून त्याला बाळासाहेब ठाकरे, तसेच त्यांच्या पत्नीचे आणि पंतप्रधान मोदींचे नाव द्या, केवळ मुस्लीम नावे बदलणे हे निवडणुकीपुरते केलेले धुव्रीकरणाची नीती असल्याची भाजपवर त्यांनी टीका करत सध्या सरकारमध्ये बसलेले नेते हे करता आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला.

लव्ह जिहादवर वक्तव्य : काही दिवसापासून लव्ह जिहाद विरोधात राज्यात हिंदू संघटनाकडून मोर्चे काढले जात आहे. यावर अबू आझमी म्हणाले की, लव जिहाद विषयीही हे लोक बोलतात. मुस्लिम धर्मातील मुलींना आना दोन लाख रुपये देऊ परंतु मुस्लिमांनी तर असं कधी सांगितलं नाही. त्यामुळे भांडण मिटवण्यासाठी मुस्लिम धर्मात आपण लग्न करा दुसऱ्या जातीमध्ये लग्न करू नका, जेणेकरून भांडण होणारच नाही, असा सल्ला त्यांनी मुस्लिम बांधवांना दिली.

हेही वाचा : Teacher Graduate Election Process : शिक्षक, पदवीधर मतदारसंघात 'असे' निवडले जातात आमदार; महाविकास आघाडी Vs भाजप थेट लढत

Last Updated : Jan 22, 2023, 9:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.