ETV Bharat / state

बेपत्ता तरुण-तरुणीचे रहस्य उलगडले, 4 वर्षांपासून करत होते चोरून संसार - कल्याण चोरून संसार करणारे तरुणी-तरुणी सापडले

अंबरनाथ एमआयडीसी मधील एकाच कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणीच्या गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता होण्याचे रहस्य शोधण्यात कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. शहबाज इंद्रीस शेख आणि सीमा संदीप कोष्टी अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी 4 वर्षांपूर्वी लग्न केले होते. शिवाय, तेव्हापासून ते चोरून संसार करत होते. आता त्यांचा शोध लागला आहे.

kalyan
kalyan
author img

By

Published : Jun 20, 2021, 9:54 PM IST

ठाणे - अंबरनाथ एमआयडीसीमधील एकाच कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुण आणि तरुणीच्या गेल्या 4 वर्षांपासून बेपत्ता होण्याचे रहस्य शोधण्यात कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. प्रेम प्रकरणातून या तरुण-तरुणीने चक्क लग्न केल्याचे उघडकीस आले आहे.

चार वर्षापसून चोरून करत होते संसार -

31 मे 2017 रोजी कल्याण पश्चिमेत राहणारा शहबाज इंद्रीस शेख (22 वर्षे, रा. रोहीदासवाडा, गौसिया मस्जिदच्या बाजूला) हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची आई जमीला इंद्रीस शेख (40) यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. आदल्या दिवशी मुंबईतून कपडे घेऊन येतो, असे सांगून शहबाज गेला होता. तो परत घरी आला नाही. तेव्हापासून बाजारपेठ पोलीस त्याचा शोध घेत होते. रविवारी (20 जून 2021) पोलीस सय्यद अत्तार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. याच शहबाज शेखने अंबरनाथ एमआयडीसीतल्या एका खासगी कंपनीत त्याच्यासोबत कंपनीत काम करणाऱ्या सीमा संदीप कोष्टी हिच्यासोबत लग्न केले आहे. सीमा हिच्या बेपत्ताबाबत मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद दाखल आहे. तर शहाबाद आणि सीमा हे मालेगाव येथे राहत होते. सद्या ते कोनगाव येथील तकवा मस्जिदच्या बाजूला राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यावरून पोलिसांनी या ठिकाणी जाऊन खात्री केली. बाजारपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद असलेला शहबाज आणि मनमाड पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेली सीमा या दोघांनी लग्न केले असल्याचे समजले. त्यांनतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

चुलत्याच्या अंतयात्रेसाठी आल्याने भांडाफोड

दोन दिवसांपूर्वी शहबाजच्या चुलत्याचे निधन झाले असल्याने तो सीमासह कल्याणमध्ये आल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सानप यांनी चौकशी केली. त्या दोघांनी लग्न केल्याचे समोर आले. अशाप्रकारे गेल्या 4 वर्षांपासून बेपत्ता झालेल्या सीमा उर्फ सना संदीप कोष्टी (सध्याचे नाव सना शहबाज शेख) यांना शोधण्यात यश आले आहे.

हेही वाचा - नागपुरातील कारागृहात शिक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या कैद्यांचा सह कैद्यावर प्राणघातक हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.