ठाणे - मीरा भाईंदर शहरात गुरूवारी (१६ जुलै) १२५ नव्या कोरोनाबधित रूग्णांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १४७ जण कोरोनावर उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. आज ३ कोरोनाबधितांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, तर मृत्यूची संख्याही वाढत आहे. आज मीरा भाईंदर कार्यक्षेत्रात आढळून आलेल्या कोरोनाबधितांमध्ये ८३ नवे रुग्ण असून ४२ जणांना संसर्गामुळे लागण झाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी दिली. एकंदरीत मीरा भाईंदर कोरोनाबधितांचा आकडा ६ हजार ७५ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ४ हजार ६४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर एकूण २१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १ हजार २१७ जणांवर कोविड १९ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मीरा भाईंदर शहरात आतापर्यंत १८ हजार २८१ जणांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १० हजार ६९१ जणांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला आहे.एकूण ६ हजार ७५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. तर अद्याप १ हजार ५१५ जणांचा कोविड -१९ चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहे.