ETV Bharat / state

मीरा भाईंदर; सत्ताधारी भाजपच्या पक्षांतर्गत वादामुळे नगरसेवक अनुउपस्थित, पालिकेची विशेष महासभा रद्द

author img

By

Published : Sep 16, 2020, 9:27 PM IST

मीरा भाईंदर महानगरपालिकेची विशेष महासभा १५ सप्टेंबरला आयोजित करण्यात आली होती. परंतु, भाजप पक्षाची आढावा बैठक अचानक आयोजित केल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवक ऑनलाइन महासभेला उपस्थित राहिले नाही.

mira bhayandar
मीरा भाईंदर पालिकेची विशेष महासभा रद्द...

मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर महानगरपालिकेची मंगळवारी विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, महासभेला फक्त २२ नगरसेवक उपस्थित असल्यामुळे ही सभा रद्द करावी लागली. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक पक्षाच्या आढावा बैठकीस उपस्थित होते. विशेष महासभेला अनुउपस्थित राहिल्यामुळे इतर पक्षाच्या नगरसेवकांनी ऑनलाइन महासभेला पाठ फिरवली.

मीरा भाईंदर महानगरपालिकेची विशेष महासभा १५ सप्टेंबरला आयोजित करण्यात आली होती. परंतु, भाजप पक्षाची आढावा बैठक अचानक आयोजित केल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवक ऑनलाइन महासभेला उपस्थित राहिले नाही. मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून दुसऱ्यांदा ऑनलाइन महासभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रलंबित विषयावर महासभेत चर्चा होणार होती. सध्या शहरात कोरोनाचा कहर झाला आहे. मृत्यू दर देखील वाढत आहे. या साठी नवीन उपाययोजना तसेच गेल्या महासभेत पारित केलेल्या ५०% कर सवलतचा ठराव मंजूर करण्यात आला. परंतु, प्रशासनाने सदर विषय फेटाळून लावला आहे. २५% कर सवलत देण्यात येईल ,असे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. परंतु, भाजपकडून कर सवलतसाठी प्रयत्न केला जात आहे. परंतु, आयुक्त डॉ विजय राठोड यांनी संबंधित कर सवलतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

महानगरपालिकेची महासभा पूर्वी माजी आमदार नरेंद्र मेहता हे सर्व नगरसेवकांची बैठक घेतली जाते. त्यानंतर सर्व विषय ठरवले जातात. परंतु, यावेळी मेहता यांनी आयोजित केलेल्या बैठकीला २८ ते ३० नगरसेवक उपस्थित होते. यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी महापौर दालनात नगरसेवक यांची बैठक घेतली. यावेळीं ३० ते ३२ नगरसेवक उपस्थित होते, अशी माहिती भाजप सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे.

आमदार नरेंद्र मेहता यांचा अपक्ष आमदार गीता जैन यांनी पराभव केल्यानंतर मेहता यांच्या एकहाती कारभारामुळे भाजपचे अनेक नगरसेवकांनी आता खुला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यासर्व पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी माजी राज्यमंत्री विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाईंदर पश्चिमला बैठक पार पडली. याबैठकीत अनेक नगरसेवकांमध्ये वाद झाले. तसेच जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे इतर कोणाचे पक्षात, मनपा कामात हस्तक्षेप चालणार नाही, असे मत अनेक नगरसेवकांनी मांडले, अशी माहिती भाजप सूत्रांकडून मिळाली. मीरा भाईंदर भाजप पक्षात फूट पडली असून वेगळे गट निर्माण झाले आहेत.

लोकप्रतिनिधींना शहरातील विविध विषय मार्गी लागावेत यासाठी जनतेने निवडून पाठवले आहे. परंतु, सत्ताधारी भाजप पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. विशेष महासभेचे पूर्वसूचना असताना भाजप पक्षांनी नगरसेवक यांची बैठक भाईंदर पश्चिमच्या खासगी हॉलमध्ये आयोजित केली होती. या बैठकीत स्थानिक नेतृत्वाबाबत जोरदार वाद निर्माण झाले आहेत. माजी आमदार यांच्याकडे कोणतेही प्रशासकीय पद किंवा पक्षाचे पद नसताना प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत असल्याने भाजपचे अनेक नगरसेवक नाराज असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या अंतर्गत वादामुळे महानगरपालिकेची विशेष महासभा भरली नसून, मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एकूण ९५ नगरसेवक आहेत. महासभा चालवण्यासाठी एकूण ४८ नगरसेवकांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. मात्र १५ सप्टेंबरला आयोजित सभेला फक्त २२ नगरसेवक ऑनलाइन उपस्थित होते. सत्ताधारी भाजपचे ४, शिवसेनेचे ११ तर काँग्रेसचे ७ नगरसेवक होते. कोरम पूर्ण नसल्यामुळे डॉ विजय राठोड यांनी महासभा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.