ETV Bharat / state

अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत वर्गातच अश्लील चाळे; विकृत मुख्याध्यापकाला बेदम चोप

प्रमोद नायक (वय ३५) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्याध्यापक त्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेम करीत असल्याचा प्रकारही समोर आला. गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली. या मुख्याध्यापकाला कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

minor-girl-physical-abuse-in-thane
अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत वर्गातच अश्लील चाळे
author img

By

Published : Dec 26, 2019, 9:00 PM IST

ठाणे - एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत वर्गात मुख्याध्यापकाने अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार भिवंडी तालुक्यातील शेलार गावातील एका शाळेत घडला आहे.

अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत वर्गातच अश्लील चाळे
घटनेची माहिती पीडितेच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी शाळेच्या आवारात धाव घेऊन त्या विकृत मुख्याध्यापकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. भिवंडी तालुका पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून विकृत मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- माळेगावच्या कुस्तीची दंगल गाजली 'दाजी' 'भावजीं'च्या राजकीय कुस्तीने

प्रमोद नायक (वय ३५) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्याध्यापक त्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेम करीत असल्याचा प्रकारही समोर आला. गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली. या मुख्याध्यापकाला कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी-वाडा रोडवरील शेलार गावात एक माध्यमिक शाळा आहे. या शाळेत १४ वर्षाची पीडिता १० वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी प्रमोद हा पीडितेवर एक तर्फी प्रेम करीत होता. ३ दिवसांपूर्वीच त्याने तीला शाळेच्या मैदानात गाठून कार्यलयात येण्यास सांगितले. मात्र, पीडिता गेली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी वर्गात कोणी नसल्याचे पाहून त्याचा फायदा घेत, आरोपीने तिच्याशी वर्गात अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केला. या घृणास्पद प्रकाराने भयभीत होऊन पीडित मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.

आईने नातेवाईकांसह शाळेत धाव घेऊन मुख्याध्यापकाला गाठून घडलेल्या प्रकाराचा जाब विचारला. मात्र, उलट-सूलट बोलण्याने नातेवाईकांनी संतप्त होऊन त्याला चोप दिला. घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपी मुख्याध्यापकाला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. अधिक तपास भिवंडी तालुका पोलीस करीत आहेत.

Intro:kit 319Body:संतापजनक ! मुख्याधापकाचे अल्पवयीन विद्याथींनीशी वर्गातच अश्लील चाळे ; विकृत मुख्याधापकाला बेदम चोप

ठाणे : एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्याथींनीशी वर्गातच विकृत मुख्याधापकाने अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार भिवंडी तालुक्यातील शेलार गावातील एका शाळेत घडली आहे.
घटनेची माहिती पीडितेच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी शाळेच्या आवारात धाव घेऊन त्या विकृत मुख्याधापकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. भिवंडी तालुका पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून विकृत मुख्याधापकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद नायक (३५) असे विकृत मुख्याधापकाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा विकृत त्या अल्पवयीन विद्याथींनीशी एकतर्फी प्रेम करीत असल्याचा प्रकारही समोर आला. तर गुरु शिष्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून या विकृत मुख्याधापकाला कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी - वाडा रोडवरील शेलार गावात जीवन ज्योती शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळा असून या शाळेत १४ वर्षाची पीडिता १०विच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यापासून आरोपी प्रमोद हा पीडितेवर एक तर्फी प्रेम करीत होता. ३ दिवसापूर्वीच त्याने तिला शाळेच्या मैदानात गाठून मुख्याधापक कार्यलयात येणेचे सांगितले. मात्र पीडिता गेली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी वर्गात कोणी नसल्याचे पाहून त्याचा फायदा घेत, आरोपीने तिच्याशी वर्गात अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केला.
या घृणास्पद प्रकाराने भयभीत होऊन पीडित मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने नातेवाईकांसह शाळेत धाव घेऊन त्याला गाठले आणि घडलेल्या प्रकारचा जाब विचारला.मात्र उलटसुलट बोलण्याने नातेवाईक संतप्त होऊन त्याला चोप दिला. घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होवून आरोपाला ताब्यात घेतले. दरम्यान आरोपी मुख्याधापकाला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. अधिक तपास भिवंडी तालुका पोलीस करीत आहेत.
(कृपया पीडित मुलीचा चेहरा ब्लर करणे )
Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.