ETV Bharat / state

चुलत बहिण झोपेत असताना अल्पवयीन भावाचे घृणास्पद कृत्य, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न - minor brother physical abuse cousin

२१ वर्षीय पीडिता आपल्या आईसह कल्याण तालुक्यातील एका गावात राहते. तर १७ वर्षीय अल्पवयीन आरोपी चुलत भाऊ कुटूंबासह शेजारीच राहत आहे. पीडितेच्या वडिलांचे २० वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे दोघी मा -लेकी घरगुती उदयोग करून उदर्निवाह करतात. त्यातच दिवाळी सणाच्या निमत्ताने दोघी माय-लेकींनी पणत्या तयार करून त्या नजीकच्या ( thane crime news ) बाजारपेठ विक्रीसाठी नेत होत्या. त्यातच २१ ऑक्टोंबर रोजी पीडितेची आई पणत्या विक्रीसाठी बाजारात गेली होती.

victims suicide attempt in Thane
पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
author img

By

Published : Oct 27, 2022, 4:15 PM IST

ठाणे : २१ वर्षीय चुलत बहिण झोपेत असतानाच १७ वर्षीय सख्या चुलत भावाने स्वतःच्या अंगावरील ( cousin sleeping physical abuse ) कपडे काढून बहिणीशी घृणास्पद केले. भयभीत होऊन बदनामीच्या भीतीने पीडितेने ( victim suicided attempt in Thane ) विष प्राशन करून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ( Kalyan Taluka crime news ) ठाण्यात अल्पवयीन चुलत भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ वर्षीय पीडिता आपल्या आईसह कल्याण तालुक्यातील एका गावात राहते. तर १७ वर्षीय अल्पवयीन आरोपी चुलत भाऊ कुटूंबासह शेजारीच राहत आहे. पीडितेच्या वडिलांचे २० वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे दोघी मा -लेकी घरगुती उदयोग करून उदर्निवाह करतात. त्यातच दिवाळी सणाच्या निमत्ताने दोघी माय-लेकींनी पणत्या तयार करून त्या नजीकच्या बाजारपेठ विक्रीसाठी नेत होत्या. त्यातच २१ ऑक्टोंबर रोजी पीडितेची आई पणत्या विक्रीसाठी बाजारात गेली होती.

एकटी असल्याने गैरफायदा घेण्याचा प्रयत्न पीडिता एकटीच घरी होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी भाऊ पीडितेच्या घरी आला. त्यावेळी दुपारीच वेळ असल्याने पीडितेला त्याला तू तुझ्या घरी जा मी झोपते असे बोलून ती हॉलमध्ये झोपली होती. ती झोपल्याचे पाहून आरोपी भावाने स्वतःच्या अंगावरील कपडे काढून तिच्या अंगावर झोपून अत्याचाराचा प्रयत्न केला. पीडितेला जाग येताच तिने त्याला जोरदार धक्का देऊन त्याच्या तावडीतून सुटका केली. शेजारी असलेल्या दुसऱ्या काकाकडे आसरा घेतला.

थायमाईट विषारी औषध घेतले सायंकाळी आई बाजारातून घरी आल्यावर पीडितेने घडलेला प्रकार आईला सांगताच तिला धक्काच बसला. आईने आरोपीचे घर गाठत त्याच्या आई-वडिलांना प्रकार सांगितला. मात्र आरोपीच्या घरच्यांनी आमचा मुलगा असे करू शकत नाही, असे बोलून पीडितेच्यावरच आरोप केला. पीडिता तणावात येऊन बदनामीच्या भीतीखाली होती. त्यातच तिने २३ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास विष प्राशन केले. त्यावेळी पीडितेची आई घरातच काम करत असताना बराच वेळ झाला. मुलगी झोपेतून उठली का नाही. हे पाहण्यासाठी आई गेली असता, तिला पीडितेच्या तोंडातून उग्रवास आला. आईने विचारणा केली असता पीडितेने थायमाईट विषारी औषध प्राशन केल्याचे आईला सांगितले. त्यानंतर पीडितेला तातडीने टिटवाळा भागातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडितेवर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोपीला जामिनावर सुटका याप्रकरणी २४ ऑक्टोंबर रोजी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपी चुलत भावावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी २६ ऑक्टोंबर रोजी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर केले. त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सावंती जगताप करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.