ठाणे - केंद्रातील भाजप सरकार हे आंधळे व बहिरे सरकार असल्यानेच त्यांना शेतकरी व सामान्य जनतेचे हाल दिसत नाहीत, अशी टीका राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली. कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असतानाही हे सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे, असा सवाल यावेळी कदम यांनी केला. या कायद्यावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणून चार सदस्यीय समिती स्थापन केल्याने या सरकारची नाचक्की झाल्याचे देखील कदम यांनी सांगितले.
...तोपर्यंत काँग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल
मंत्री विश्वजित कदम हे मंगळवारी (दि. 12 जाने.) ठाण्यात जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे सात्वन करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार हे जुलमी सरकार असून या कायद्यामधून उगचाच शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात केंद्र सरकार ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकारने हा कायदा रद्द करावा, अशी मागणी विश्वजित कदम यांनी केली आहे. भाजप प्रणित केंद्र सरकार हा कायदा बदलत नाही, तोपर्यंत कॉंग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत राहील, असा इशारा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिला आहे.
आर्थिक संकटात सापडलेले आपले राज्य पुन्हा भरारी घेईन
गेल्या वर्षभरत देशाची आणि राज्याची प्रचंड आर्थिक हानी झाली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हे राज्य पुन्हा एकदा उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - उल्हासनगरात कामबंद आंदोलनाचा इशारा देताच सातवा वेतन आयोग लागू
हेही वाचा - ठाण्यात शिरला बर्डफ्ल्यू; शहरातील चिकन शॉपचा सर्व्हे सुरू